पुणे चाकन दि ०५ : – चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्निचा खून केल्याची धक्कादायक घटना चाकण साईबाबा पॅराडाइझ हाऊसिंग सोसायटी, मध्ये घडली आहे. पतीने
डोक्यात स्टम्प मारुन , नायलॉन दोरीने गळा आवळुन व हाताने गळा दाबुन तिचा खून निर्घृण खून केला. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना दि ४ रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. पतीनं केलेल्या हल्ल्यात ज्योती वैभव काळे , वय २७ वर्षे या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पतीला अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी ९ च्या सुमारास ज्योती ही नेहमीप्रमाणे घरातील काम करित होती व दोघांमध्ये बाचाबाची होऊन नमुद तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांचा भाऊ आरोपी याने स्वताःची पत्नी ( मयत ) ज्योती वैभव काळे , वय २७ वर्षे रा . सदर हिचेसोबत संशयाचे कारणावरुन भांडण करुन तिचे डोक्यात स्टम्प मारुन , नायलॉन दोरीने गळा आवळुन व हाताने गळा दाबुन तिचा खून निर्घृण खून केला. आरोपी वैभव काळे हा पत्नी ज्योती हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. याच संशयावरून झालेल्या वादातून अखेर ज्योती याने तिचा निर्घृण खून केला, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास पोउपनि कठोर करित आहे