पिंपरी चिंचवड :-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या शाहरुख मिराज खान (वय २६) या तरुणाचे झम झम केटरर्स शाहरुखच्या दुकानाच्या बाजूला एका महिलेचे ब्यूटी पार्लरचे दुकान आहे. या महिलेला पाच वर्षांचा मुलगा असून सुफियान असे त्याचे नाव आहे. सुफियानही आईसोबत ब्यूटी पुार्लरमध्ये येत असल्याने त्याची शाहरुखशी ओळख झाली होती. त्याने मुंबईतून मोहम्मद शकील सलीम खान (वय ३२) या मित्राला बोलावून घेतले. रविवारी दुपारी सुफियान हा कुणाल सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत खेळत होता. यादरम्यान शाहरुख दुचाकीवरुन तिथे पोहोचला. त्याने सुफियानला सोबत यायला सांगितले. शाहरुख ओळखीचा असल्याने सुफियान त्याच्यासोबत फिरायला गेला. तर मोहम्मद हा दुकानात थांबला होता. सुफियानचे आई- वडील काय करतात यावर लक्ष ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते. दोन दिवसांनी शाहरुखने सुफियानच्या आईला फोन करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. ७ नोव्हेंबर रोजी पैसे घेऊन चिंचवडमधील बस स्थानकात या, असे त्याने सुफियानच्या आईला सांगितले होते. यानुसार पोलिसांनी सापळा रचून शाहरुखला अटक केली. वाकडमधील नऊ पोलीस अधिकारी आणि जवळपास ५० कर्मचाऱ्यांनी सुफियानची सुखरुप सुटका व्हावी, यासाठी अथक मेहनत घेतली. या कामगिरीसाठी खान कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.