पुणे,दि.१४ :- पुणे विभाग पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात घेतले जाणारे निर्णय तसेच डेटा एन्ट्रीची तपासणी विभागीय आयुक्त तसेच मतदार नोंदणी अधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी केली.
यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी विहित कालमर्यादेत अर्जांवर निर्णय घेणे तसेच डेटा एन्ट्रीचे काम योग्यरित्या पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या. या तपासणीदरम्यान जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर ,उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, तहसिलदार सुनील कोळी उपस्थित होते.