निरा नरसिंहपुर दि, ५ :- श्री शेत्र पिंपळवाडी कर्जत ते पंढरपूर कार्तिकी पायी दिंडी सोहळ्याचे आगमन पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे झाले दिंडीप्रमुख गोपाळ महाराज शर्मा यांच्या मार्गदर्शना खाली १२५ वर्षाची परंपरा दिंडी सोहळा पंढरपूर कडे कार्तिकी वारी साठी पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी हा सोहळा सालाबाद प्रमाणे परंपरा चालू आहे असे दिंडीप्रमुख गोपाळ महाराज शर्मा यांनी पिंपरी बुद्रुक येथे वारकऱ्यांना सांगितले पिंपरी बुद्रुक मध्ये आलेली दिंडी व वारकरी भाविक भक्त हजारोंच्या संख्येने पिंपरी बुद्रुक येथे उपस्थित राहून पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील भजनी मंडळांनी आलेल्या दिंडीचे स्वागत करून चहा व नाष्टा देऊन वारकऱ्यांचे आभार मानले पिंपरी बुद्रुक मधील भजनी मंडळ प्रमुख बाळासाहेब घाडगे महेश सुतार विणेकरी महादेव सुतार शरद बोडके व ग्रामस्थ माजी सोसायटीचे चेअरमन सुनील अण्णा बोडके पाटील स्वागत करण्यासाठी गोरख बोडके अनिल लावंड उपस्थित होते पायी दिंडीचे स्वागत करण्यासाठी पिंपरी बुद्रुक गावचे आधारस्तंभ विद्यमान सरपंच आबासाहेब बोडके पाटील माजी सरपंच श्रीकांत बोडके पाटील कारखान्याचे संचालक संजय बोडके समाधान बोडके राजेंद्र लावंड प्रवीण बोडके माजी सरपंच हरिभाऊ सुतार हनुमंत पडळकर या सर्व ग्रामस्थांनी आलेल्या दिंडीचे स्वागत करून दिंडी पुढील ठिकाणी जाण्यासाठी मार्गस्थ झाली
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार इंदापूर तालुका