पुणे दि: १९ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता पुणे जिल्ह्यातील मतदारांना आवाहन करण्याकरिता व मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जिल्हा मतदार मदत केंद्र डिस्ट्रीक कॉल सेंटर जिल्हाधिकारी कार्यालय, तळमजला, भूसंपादन अधिकारी क्र. १९, पुणे यांचे कार्यालय, पुणे ‘ए’ विंग तळमजला, पुणे येथे सुरु करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघातील ज्या केंद्रावर कमी मतदान झाले आहे, अशा केंद्रातील मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक दिवसाला ३ हजार मतदारांना याप्रमाणे सुमारे ८ हजार मतदारांना मतदान करण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदान मदत केंद्राचे (डिस्ट्रीक कॉल सेंटर) संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
020-26121231, 020-26121259, 020-26121263, 020-26121264,
020-26121267, 020-26121268, 020-26121269, 020-26121271,
020-26121272, 020-26121273, 020-26121274, 020-26121275,
020-26121279, 020-26121281, 020-26121291