दौंड दि,१३:- दौंड पोलीस स्टेशन हद्दीत पुणे सोलापूर हायवे लगत खडकी रावणगाव येथील हॉटेल व ढाब्यांवर अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री होत असले बाबत गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक मा.श्री. जयंत मीना यांना मिळाली होती व क्राइम ब्रांच चे चंद्रशेखर यादव यांना रेड करणेबाबत सांगितले त्याप्रमाणे खडकी रावणगाव येथील हॉटेल छत्रपती, दयानंद, जय शिवाजी, त्रिमूर्ती याठिकाणी एकाच वेळी खालील नमूद स्टाफ सह अचानक छापा घातला असता त्या ठिकाणी आरोपी हे बेकायदेशीर रित्या, कोणताही परवाना नसताना देशी विदेशी दारूचा मोठा साठा बाळगून त्याची विक्री करत असताना मिळून आले. यांचेकडून खालील वर्णनाचा माल मिळून आला.1) 50,100=00 एकूण 334 नंबर वन व्हिस्की च्या बाटल्या2) 52,364=00 एकूण 1007 टँगो पंच,देशी दारूच्या बाटल्या3) 17,160=00 एकूण 330 संत्रा देशीदारूच्या बाटल्या5) 12,380=00 एकूण 96 ऑफिसचॉईस व्हिस्की180 mm बाटल्या6) 5,320=00 एकूण 96 ऑफिसचॉईस व्हिस्की90 mm बाटल्या7)17,820=00 एकूण 108 किंगफिशर बिअर 650 mm8) 1,540=00 एकूण 11 इम्प्रेरीयरब्लू व्हिस्की 180 mm 1,56,684 /- आरोपी1) मोहन बबन काळभोर रा खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे,2) दत्तात्रेय झुंबर काळभोर रा खडकी ता दौंड जि पुणे,3) नवाज साधू साहेब शेख पुढे रा खडकी ता दौंड जि पुणे,4) ज्ञानदेव भैय्याजी गुणवरे रा खडकी ता दौंड जि पुणे,5) कांताबाई दत्तात्रेय सोळस्कर दौंड जि पुणे,6) शहाजी एकनाथ गुणवरे रा खडकी ता दौंड जि पुणे यांना अटक केली आहे सदर ची कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो(भा पो से), पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण), मा.जयंत मीना सो(भा पो से), अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, मा. ऐश्वर्या शर्मा(भा पो से), उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड उपविभाग-यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक, पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे, पो.कॉ. दशरथ कोळेकर,पो.कॉ. विशाल जावळे,पो.कॉ. शर्मा पवार,आणि सहा.फौज चौधर,पो हवा आटोळे,पोलीस जवान, अभिजित एकशिंगे,मिनल शिवरकर, म.पो.शि.भिगवण पोलीस स्टेशनतसेच,श्री. सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक,पो.ना. मलगुंडे,पो.कॉ. सय्यद, दौंड पोलीस स्टेशन यांनी,केली.