पुणे दि०७ : -पुणे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आशिष कांटे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.उमेदवारी अर्ज मागे घेऊन यावेळी आशिष कांटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील .कांटे यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देत पक्षात स्वागत केले.कांटे यांच्या पक्ष प्रवेशाबद़दल बोलताना श्री. पाटील म्हणाले की, “देशाचे लोकप्रिय तथा कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीने प्रभावीत होऊन अनेक तरुण भारतीय जनता पक्षात सक्रिय काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यानुसार आशिष कांटे यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.