पुणे,दि.०६ :- पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे शहरातील फरासखाना परिसरात लॉटरीच्या नावाखाली चालणारे जुगार दुकान दारावर छापे टाकले.आहे या छाप्यात जुगार आणी लॉटरीचे १४ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.आहे तसेच जुगार खेळणाऱ्या आणी चालवणाऱ्या ५४ जणांवर कारवाई करण्यात आली. फरासखाना परिसरात मोठ्या प्रमाणात सोरट आणी लॉटरीचा नावाखाली बेटींग व्यवसाय अनेक वर्षापासून खुलेआम सुरु होता.व पुणे शहरात नव्याने आलेल्या सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) विजय चौधरी यांना काही गोपनीय माहिती मिळाली होती व यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राकेश लॉटरी सेंटरवर सिंगल डिजिट व ब्रॅकेट व तिकडम व सोरट हि लॉटरी नावाने जुगार चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती . त्यानूसार छापा टाकला असता सदर ठिकाणी एकूण १० व्यक्ती जुगार खेळताना आढळल्या तेथून १,०१,१६०/-रुपये रोख, ११ मोबाईल फोन (किं. ७८,०००), एक कॉम्प्युटर सेट ( किं. १०,०००), व्हिडिओ गेम (किं १०,०००) असा एकूण १,९९,१६० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. तसेच साई व केतन लॉटरी सेंटरमध्ये सिंगल डिजिट व सोरट लॉटरी नावाचा जुगार खेळत असताना १६ व्यक्ती आढळल्या. त्यांच्याकडून २,०९,४४०/-रुपये रोख, १६ मोबाईल फोन (किं. ८३,०००), ३ कॉम्प्युटर सेट ( किं. ४५,०००), ८ व्हिडिओ गेम मशीन (किं १,६०,०००) असा एकूण ४,९७,४४० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलेला आहे.
एकूण मुद्देमाल १४ लाखाचा हस्तगत
तसेच परिसरातील इतरही लॉटरी सेंटरवर कारवाई करण्यात आली. एकूण केलेल्या कारवाईत एकूण ६ लाखांची रोकड, ५४ मोबाईल, आठ संगणक, १७ व्हिडीओ गेम असा १४ लाखंचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यामध्ये सहा वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ५२ जणांना आरोपी करण्यात आले.या कारवाईत सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव आणी इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.