इंदापूर दि १३ :- धो धो पाऊस पडून माझा शेतकरी राजा सुखी समाधानी होऊ दे ….आमदार श्री दत्तात्रय (मामा )भरणे यांची इंदापूर तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणार्या विठ्ठलवाडी मंदिरात विठ्ल -रूक्मिनी यांच्या चरणी प्रार्थना…… संपुर्ण महाराष्ट्रात करोडो वारकरी भाविक बांधवांचे व सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपुरचे विठुराया यांच्या चरणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक दाखल झाले. इंदापूर तालुक्यातील प्रति पंढरपुर असलेल्या विठ्ठलवाडी येथील विठ्ठल -रूक्मिनी मंदीरात आज इंदापूर तालुक्याचे आमदार श्री दत्तात्रय( मामा )भरणे यांनी भक्तिमय वातावरणात अनंती अनंत रूप धारण केलेल्या विठुरायाच्या चरणी लीन होऊन धो धो पाऊस पडून जगाचा पोशिंदा माझा शेतकरी बांधव सुखी समाधानी होऊन या राज्यातील दुष्काळी परिस्थिती जाऊ दे अशा प्रकारची प्रार्थना केली. यावेळी मंदीर समितीच्या वतीने आमदार श्री भरणे मामा यांचा समितीचे अध्यक्ष श्री हरीदास माने, सचिव श्री मोहन काळे यांनी श्रीफळ, हार, फेटा देऊन सत्कार केला. यावेळी आमदार श्री भरणे मामा यांनी मंदीर परीसराची पाहणी करून विश्वशांतीचा प्रचार करत असलेल्या प्रजापिता ब्रहमकुमारी संस्थेच्या अनुयायांशी चर्चा केली. यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अंकुश काळे, कळसचे सरपंच श्री गणेश सांगळे यांच्यासह विठ्ठलवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
नीरा नरसिंगपूर. प्रतिनिधी. बाळासाहेब सुतार