मुळशी (पुणे) दि,०५ : – पुणे मुळशी तालक्यातील ताम्हिणी घाटाच्या जवळ असलेल्या पिंपरी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या खोल दरी जवळ वेगोन आर कार गाडीमध्ये 2 जळालेले मृतदेह सापडलेले आहेत.पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते ९० टक्के जळालेले मृतदेह असून विजय आबा साळुंके (वय ३५, मु पो बांदा, जिल्हा.सिंधुदुर्ग),विकास विलास गोसावी ( वय ३२ मू पो निप्पणी, जिल्हा कोल्हापूर) मयातांची नावे आहेत. हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता यावेळी पोलिसांनी व्यक्त केली.शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघांचीही बेपत्ता असल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.