नरसिंहपुर दि, २७:- महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभवासाठी दाखल झाले आहेत. नरसिंहपुर येथील ७०-८० एकर क्षेत्रातील ऊस हुमणीपासून वाचवण्यासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक व जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. या विद्यार्थ्यांनी सापळा लावून हजारो किडे पकडून विल्हेवाट लावली. आणखी सात दिवस सापळे लावण्यात येणार आहेत. यावेळी कृषीदूतांनी हुमणी नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन केले.
जून ते आॅगस्ट हुमणीचे भुंगेरे जमिनीवर येतात व जमिनीतून बाहेर आल्यावर हे किडे कडूनिंब बोर बाभूळ यासारख्या वृक्षावर राहुन गुजरान व नर माधी मिलन करतात. सूर्योदयापुर्वी परत जातात. त्यामुळे हि किड दिसून येत नाही. प्राथमिक अवस्थेत किडवर कमीत कमी खर्चाने नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळे प्रभावी ठरतात.
हे कृषीदुत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष मा.श्री. जयसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डि. पी. कोरटकर प्राचार्य आर. जी. नलावडे कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. आडत प्रा. डि. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम सत्र पुर्ण करणार आहेत
या ठिकाणी रत्नाई कृषी महाविद्यालयातील नरसिंहपुर येथील कृषीदुतांच्या गटात शुभम भिसे स्वप्निल गरड अनिकेत येलपले गणेश माने प्रणित वाघमारे प्रकाश कुराडे अजय कोळी ज्ञानेश्वर जाधव प्रमोद गुंडगिरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
बाळू राऊत प्रतिनिधी