पुणे,दि.०१ :- पुणे शहरात आता छेड काढणाऱ्यां.रोड रोमिओची त्वरित कारवाईचे आदेश पोलीस पुणे शहर आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सवाला (दि.७) पासून सुरुवात होत आहे. व पुण्यात देशातील वेगवेगळ्या भागातून लोक येतात. दरम्यान शहरात मोठी गर्दी पाहायला मिळते. या गर्दीत तरुणींचीमहिलांचे दागिने चोरणे, तसेच मोबाईल संच चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मध्यभागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे . छेड काढल्याची तक्रार आल्यास बंदोबस्तावरील पोलीस सडक सख्याहरींना पकडून त्यांचे छायाचित्र भर चौकात लावणार आहेत. छेडछाड करणाऱ्यांची पोलिसांकडून धिंडही काढण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला
महिला पोलिसांची पथके, तसेच दामिनी पथक गर्दीत गस्त घालणार आहेत. साध्या वेशातील पोलिसांची पथके मध्यभागात गस्त घालणार आहेत. गर्दीत महिलांची छेड काढणारा, तसेच अश्लील कृत्य केल्याचे आढळून आल्यास त्याची छायाचित्र काढण्यात येणार आहे.
छेड काढणाऱ्याचे नाव, पत्ता, छायाचित्र फलकावर छापण्यात येणार आहेत.
अशा प्रकारचे पोलिसांकडून फलक चौकाचौकात लावण्यात येणार आहेत.
रोड रोमिओची पोलिसांकडून धिंडही काढण्यात येणार आहे.