पुणे,दि.२८:- पुणे शहरातील बेवारस सापडलेल्या वाहन पोलिसांनी जप्त करण्यात आलेल्या वाहन व वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जाते. दंडात्मक कारवाई करून अशी वाहने सोडून दिली जातात. मात्र, गंभीर प्रकरणात सदर वाहनांवर खटला दाखल करून ती जप्त केली जातात. या वाहनांवरील कार्यवाही पूर्ण करून वाहनधारकांनी संबंधित वाहन सोडून घेणे अपेक्षित असते. मात्र, जप्त केलेली अनेक वाहने वर्षानुवर्षे सोडवली जात नाहीत. बेवारस वाहनांचा आता लिलाव केला जाणार आहे. पुणे शहारातील विविध पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागात अशी सुमारे १ हजार १८६ वाहने आहेत. यात दुचाकी, चारचाकीचा समावेश आहे.
वाहन मालकांचा मुळ मालकांच्या शोध घेऊनही नसापडत असल्याने ही प्रक्रिया केली जाणार आहे.
अपघात, चोरी तसेच फसवणुकीसह इतर काही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनेकदा संबंधित वाहने जप्त केली जातात. तर, वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जाते. दंडात्मक कारवाई करून अशी वाहने सोडून दिली जातात. मात्र, गंभीर प्रकरणात सदर वाहनांवर खटला दाखल करून ती जप्त केली जातात. या वाहनांवरील कार्यवाही पूर्ण करून वाहनधारकांनी संबंधित वाहन सोडून घेणे अपेक्षित असते. मात्र, जप्त केलेली अनेक वाहने वर्षानुवर्षे सोडवली जात नाहीत.
त्यावरील कर, दंड भरला जात नाही. त्यामुळे ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे पडून असतात. शहरात पोलीस ठाण्यांच्या आवारात अशी १ हजार १८६ वाहने आहेत. अनेक वाहने वर्षानुवर्षे एकाच जागेवर असल्याने कुजली आहेत. न्यायालयातून प्रकरण खारीज केल्यानंतरही नागरिक वाहने नेत नाहीत. यामुळे पोलीस स्टेशन आवारात जागा कमी पडत आहे. त्यामुळे पोलिसांकडून या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.
…१५ दिवसांत अर्ज करावा
पोलिसांनी शोध घेऊनही वाहनांचे मालक सापडले नाहीत. नागरिकांनी पाहणी करून कोणाचे वाहन असल्यास पुढील १५ दिवसांत संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्यासमक्ष उपस्थित राहून अर्जासह गाडीची मालकी हक्क दर्शवणारी कागदपत्रे सादर करून हक्क सिद्ध करावा. अन्यथा सदरची बिनधनी वाहने शासनाच्या स्वाधीन आहेत, असे समजून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८५ (२) मधील अधिकारानुसार वाहने लिलावात विकली जाणार आहेत.
“संबंधित वाहने अनेक वर्षांपासून पोलीस ठाणे, वाहतूक विभागाच्या आवारात पडलेली आहेत. त्यांच्या मालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. मात्र, ते मिळून आलेले नाहीत. त्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहने लिलावाने विकण्यात येणार आहेत.” – रोहिदास पवार, उपायुक्त, वाहतूक शाखा.