पुणे,दि.१३:- पुणे परिसरातील औंध येथे गुरुवारी (दि.13) रोजी पहाटे औंध येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तिघांना रॉडने बेदम मारहाण करुन लुटण्याचा प्रयत्न केला . यामध्ये जखमी झालेल्या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना औंध येथील एका मोबाईल शॉपी समोरील रोडवर पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत श्रेयस सतीश शेट्टी (वय-30 रा. अश्विनी सोसायटी, औंध रोड, खडकी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 20 ते 25 वयोगटातील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत रामसोबीतकुमार ठक्कु मंडल (वय-38 रा. मंगलम कन्स्ट्रक्शन साईट, परिहार चौक, औंध), समीर रॉय चौधरी (वय-77 रा. सायली गार्डन सोसायटी, औंध) हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, युनीट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे करीत आहेत.