पुणे,दि.०८:- झुंजार ऑनलाइन –हडपसर परीसरात 14 वर्षाच्या मतीमंद मुलीला रस्त्यात अडवून तिला मारहाण केली. तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केला हा प्रकार गुरुवारी (दि.6) सायंकाळी सव्वा सात ते साडे सात या दरम्यान हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी फिरस्त्या आरोपीला 12 तासात अटक केली आहे
https://www.instagram.com/reel/C788-RXBimm/?igsh=MWI4d2xzOXJxZzNtdw==
याबाबत 40 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जिवा उर्फ जिवन मलील थॉमस (वय 47 रा. गोंधळेनगर, हडपसर मुळ रा. केरळ) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे
दाखल गुन्ह्याचा तपास करताना तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसून आला. प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास पथकातील पोलीस अंमलदार अजित मदने, रामदास जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी जोस उर्फ जिवन थॉमस याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी मुळचा केरळचा असून त्याचा शहरात राहाण्याचा कोणताही ठाव ठिकाणा नाही. तो मिळेल तेथे काम करुन त्याच ठिकाणी राहत होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार अजित मदने, रामदास जाधव, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, जोतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर यांच्या पथकाने केली आहे.