पुणे,दि.२४:- काल दुपारी अल्पवयीन आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि गाडीचा चालक गंगाधाम यांना पुणे शहर गुन्हे शाखेत बोलावण्यात आले होते.
त्यांच्याकडून घटनाक्रमाची माहिती घेण्यात आली. त्यांनी दिलेली माहिती आणि अपघाताची घटना यांचा ताळमेळ घालण्यात येत आहे.तो ज्या बारमध्ये दारू पित होता त्या बारच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलीस अल्पवयीन आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अल्पवयीन आरोपीने दारू प्यायली होती की नाही हे देखील मान्य केले नाही. या प्रकरणात आरोपीची रक्ताचा तपास का केला गेला नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. यावर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
अमितेश कुमार यांनी सांगितले,’ या प्रकरणात रक्ताच्या अहवालाने फारसा फरक पडत नाही. आरोपी पूर्ण शुद्धीत होता, दारू पिऊन गाडी चालवली तर लोकांचा जीवही जाऊ शकतो याची त्याला जाणीव होती. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मुद्याचा पुनरुच्चार केला असून याप्रकरणी कठोर कारवाईसाठी सर्व पुरावे गोळा केले जात असल्याचे सांगितले.’