पुणे,दि.१६:-.पुणे शहरातील सिमला ऑफिस चौकातील मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक परिसरातील वाहतुकीत शुक्रवारपासून (दि.१७) बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एसटी. स्टँड मार्ग) सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात येत आहे. वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहील.
१७) बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एसटी. स्टँड मार्ग) सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात येत आहे. वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : न.ता.वाडी चौकातून डावीकडे वळून सरळ सिमला ऑफिस चौक- उजवीकडे वळून चाफेकर चौक.
स. गो. बर्वे चौकाकडून सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग – सिमला ऑफिस चौक-डावीकडे वळून चाफेकर चौक- उजवीकडे वळून न.ता. वाडी चौक- उजवीकडे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन.
सिमला चौकाकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एल.आय.सी कडील बाजूने वीर चाफेकर उड्डाणपुलावरून जावे. वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.