पुणे, दि.११ :- पुणे शहरातील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागातील रस्त्यावर अतिक्रमण करून उभ्या असलेल्या 677 बेवारस वाहनांना नोटिसा लावण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक वाहने येरवडा, कळस, धानोरी, परिसरातील १३१ आहेत. नगररोड वडगावशेरी,३७ ढोले पाटील,६६ आँध बाणेर,३९ शिवाजीनगर घोलेरोड,३३ कोथरुड – बावधन,२२ धनकवडी, सहकारनगर,५० सिंहगड रोड,३३ वारजे, कर्वेनगर,७९ हडपसर – मुंढवा ० वानवडी – रामटेकडी १९ कोंढवा येवलेवाडी,३७ कसबा विश्रामबागवाडा ० भवानीपेठ ११ बिबवेवाडी,१२९ अशा बेवारस वाहनांवर अतिक्रमण विभागाच्या पथकांनी नोटिसा लावल्या.वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि परिसरातील सौंदर्याला बाधा पोहोचवणारे, अस्वच्छतेसाठी कारणीभूत ठरणारी, रस्त्यावरील बेवारस दुचाकी, तीन चाकी, आणि चार चाकी वाहने शोधण्याची मोठी मोहीम पुणे महानगरपालिकेने हाती घेतली आहे.याविषयी पुणे महानगरपालिका उप आयुक्त माधव जगताप म्हणाले, नोटीस लावल्यानंतर सात दिवसांनी पंचनामा करून ही सर्व वाहने दोन क्रेनच्या मदतीने रस्त्यावरून हटवण्यात येणार आहेत. रस्त्यावर पडलेली वाहने त्यांच्या मालकांनी लवकरात लवकर हटवावीत.रस्त्यावरील बेवारस वाहनानंपैकी अनेक वाहनांचे क्रमांक, काहींची इंजिनच गायब आहे. दिलेल्या नोटिशीला प्रतिसाद न आल्यास पंचनामा करून ही वाहने जप्त केली जाणार आहेत. शिवाय कारवाईचा खर्च वाहन मालकांकडून वसूल केला जाणार आहे.