पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये एका तरुणाचा खूनकेल्याची घटना रविवारी (दि.26) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती.या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात होता. अनिल राजेंद्र जाधव (वय-20 रा. कोथरुड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यातील फरार झालेल्या दोन अल्पवयीन मुलांना पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने ताब्यात घेतले आहे.रविवारी सायंकाळी अनिल जाधव याचा खुन केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलीस आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना अनिल जाधव याचा खून अल्पवयीन मुलांनी केला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. तसेच ते दोघे कोथरूड येथील चांदणी चौक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या कारणामुळे केला खून ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांकडे चौकशी केली असता, मयत अनिल जाधव हा मावळे आळीतील त्याच्या घराजवळील रस्त्यावरुन येता-जाता शिवीगाळ करुन मारहाण करत होता. तसेच तो सिगारेट आणि पेट्रोलसाठी जबरदस्तीने पैसे मागत होता. पैसे दिले नाहीतर मारहाण करत होता. याशिवाय दोन महिन्यापूर्वी अनिल जाधव आणि त्याच्या साथिदारांनी मारहाण केली होती. याच रागातून कर्वेनगर येथील बंगला क्रमांक 85 समोरील सार्वजनिक रस्त्यावर अनिलवर कोयता आणि तलवारीने वार करुन खून केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासासाठी अलंकार पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.सदरची उल्लेखनीय कामगिरी.पोलीस आयुक्त , पुणे शहर, अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त , डॉ.रविंद्र शिसवे ,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , गुन्हे शाखा , पुणे ,पोलीस उप आयुक्त ,श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , पुणे शहर , गजानन टोम्पे , मा.सहा.पोलीस आयुक्त , गुन्हे – २ , पुणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – १, गुन्हे शाखेचे सपोनि संदिप बुवा , पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे , नितीन रावळ , प्रफुल्ल चव्हाण , विजय कांबळे यांनी केली आहे .