श्रीगोंदा,दि२२:-सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत प्रचारा दरम्यान सभासद शेतकरी सत्ताधाऱ्यांना कारभारा बाबत विचारणा करू लागल्याचे दिसत आहे
काल बुधवारी चेअरमन राजेंद्र नागवडे व बाबासाहेब भोस तालुक्यातील तांदळी दुमाला परिसरात भेटीगाठी साठी गेले असता सभासदांनी एफआरपी, डिस्टलरी, गाळप बाबत प्रश्न विचारून कारभारा बाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.
दरम्यान केशव भाऊ मगर समर्थक अँड.अभय भोस यांनी सांगितले कि कार्यक्षेत्रात सभासदांच्या भावना लक्षात न घेता सत्ताधाऱ्यांनी स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या नावावर पुन्हा सत्ता मिळेल हे गृहीत धरून चुकीचा कारभार केल्याने सभासद कारखाना टिकविण्यासाठी माजी व्हाईस चेअरमन केशव भाऊ मगर यांच्या भूमिकेचे स्वागत करताना दिसत असून स्वर्गीय नागवडे बापू यांच्या स्वप्नातील सहकार केशव मगर हेच चालवू शकतात असा विश्वास निर्माण होत आहे.
दरम्यान सभासद आता ४५ वर्षे टिकलेला कारखाना भविष्यात सहकारी राहण्यासाठी केशव मगर हेच सक्षम पर्याय असून गावोगावी समर्थन वाढत आहे.
विरोधात पॅनल उभे राहत असल्यानेच गाळप क्षमता दररोज वाढत आहे उशीरा का होईना भाव जाहीर करण्यात येत आहे.
दुर्लक्षित सभासदांची सत्ताधाऱ्यांना आठवण होत आहे हि किमया केशव भाऊ मगर यांच्या व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा देऊन सहकार टिकण्यासाठी सुरू केलेल्या सभासद जागृतीचा परिणाम असल्याचे अँड.भोस यांनी शेवटी म्हंटले आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे