कर्जत,दि.१३:– कर्जत तालुक्यातील विशाल कल्याण मेंगडे हा माहीजळगाव येथील कृषी सेवा केंद्र दुकान सायंकाळी बंद करून मोटरसायकल वर घरी जात असताना दिवसभरात झालेल्या व्यवसायाचे पैसे घेऊन थापलिंग देवस्थान मार्गे कर्जतकडे येत असताना कापरेवाडी गावचे शिवारात पाठीमागून एका 220 पल्सर गाडीवर दोन अज्ञात इसमांनी पाठीमागून जोराची धडक देऊन त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचे जवळील 42,000 रुपये रोख रक्कम व मोबाईल चोरून नेले बाबत कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा कसून तपास केला परंतु आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने मिळून येत नव्हता. आरोपी विजय महादेव हुलगुंडे रा.काटेवडी ता जामखेड, जिल्हा अहमदनगर, याने त्याचे साथीदार सह सदरची जबरी चोरी केल्याचे समजल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक केली असता त्याने त्याचा दुसरा साथीदार पप्पू उर्फ योगेश देवराव गोयकर याचे सोबत गुन्हा केल्याचे कबुल केले असून, गुन्हयातील चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी विजय महादेव हुलगुंडे याचेवर दाखल गुन्हे.
147/2021 भादवी.379, विश्रामबाग पो.स्टे. जिल्हा पुणे, 509/2021 भादवी.381 येरवडा पो स्टे पुणे,79/2021 भादवी 379,34 मार्केट यार्ड पो स्टे. पुणे,348/2020भादवी 379 मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे,124/2021 कर्जत पोलीस स्टेशन अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत.
आरोपी विजय महादेव हुलगुंडे यास चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता त्यास सहा दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सलीम शेख हे करत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे