पुणे, दि.०८ :- पुणे शहरात आढळून आलेल्या ओमायक्रॉन 1 रुग्णाच्या संपर्कातील उर्वरित 17 जणांचे रिपोर्टही मंगळवारी निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी या रुग्णाच्या कुटुंबीयांसह तो राहत असलेल्या सोसायटीतील 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.पुण्यात ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेकडून संशयित 42 जणांची चाचणी करण्यात आली होती.
रविवारी (दि. 5) रोजी पुण्यातील डेक्कन परिसरात ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून त्याच्या निकटवर्तीयांसह 42 जणांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली होती.
त्यातील 25 जणांचे रिपोर्ट सोमवारी आले होते, तर उर्वरित 17 रिपोर्ट आज आले असून, हे 17 जणही निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.