पुणे,दि.०८:- गेल्या 10 वर्षापासून अंध,वंचित,विधवा व निराधार महिलांसाठी भाऊबीजेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात यंदा दिवाळी भाऊबीजेनिमित्त आज विधवा व निराधार 2000 महिलांना एकत्र करून आगळी वेगळी भाऊबीज साजरी करण्यात आली. पुणे महानगर पालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात संपूर्ण परिसरातील निराधार व विधवा महिला सहभागी झाल्या होत्या. साडी,धान्याचे किट व दिवाळी फराळ इत्यादी साहित्य या महिलांना भाऊबीज म्हणून दिले शेकडो महिलांनी आबा बागुल व कार्यकर्त्यांना ओवाळले तसेच सारा परिसर रांगोळ्यानी सजवला होता. या प्रसंगी सर्व भगिनींवर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. कोरोना अथवा अन्य परिस्थितीत विधवा झालेल्या अथवा निराधार बनलेल्या भगिनींना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांचे जीवन पूर्ववत व्हावे त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण आरोग्य सदैव चांगल्या रीतीने चालू राहावे यासाठी त्यांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही असे भावनिक आवाहन याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत,मंगलभाई भाटी, भगवान कडू, मधुकर कदम, अप्पा खवळे, ताई कसबे, नंदा ढावरे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल, सागर आरोळे ,इम्त्याज तांबोळी, समीर शिंदे, महेश ढवळे, लक्ष्मण कूतवळ , सुरेश गायकवाड,संतोष पवार, बाबलाल पोळके, संतोष पवार, सौरभ ढेबे, भरत तेलंग, सुरज सोनवणे, राजू देवेंद्र, यांनी अथक परिश्रम घेतले.
दिवाळीमध्ये अशी भाऊबीज मिळाल्यामुळे आमची जगण्याची उमेद वाढली असे अनेक भगिनींनी बोलून दाखवले याप्रसंगी नंदकुमार बानगुडे. यांनी स्वागत केले व रमेश भंडारी यांनी आभार मानले.