पुणे,दि.२२ :- पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथक -२ चे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर पो उप निरी दिंगबर चव्हाण हे स्टाफसह कोथरुड पो स्टे कायक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना , त्यांना इसम नामे १ ) चेतन मारुती मोहोळ , वय २७ रा , कानीफनाथ सोसायटी , फ्लॅट नं १४ , न्यूडीपी रोड , कोथरुड पुणे २ ) साहेबा हुलगाप्पा म्हेत्रे , वय २० रा . गादीया इस्टेट , महाराजा कॉम्पलेक्स मागे , पौड रोड , कोथरुड पुणे हे संशियतरित्या मिळुन आल्याने त्यांची झडती घेतली असता , त्यांचेकडुन ५८० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व एक दुचाकी असा एकुण ५१६०० / – चा ऐवज व अंमली पदार्थ जप्त करुन त्यांचे विरुध्द कोथरुड पो स्टे येथे गुरनं .२२८ / २०२१ , एन . डी . पि . एस . अॅक्ट कलम ( क ) , २० ( ब ) ( ii ) ( अ ) , २ ९ हा गुन्हा दाखल करण्यात आला होता . दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे आदेशाने पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड , अंमली पदार्थ विरोधी पथक -१ यांचेकडे देण्यात आला आहे . पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड यांनी नमुद आरोपींकडे अटक मुदतीत त्यांनी गुन्हयात जप्त करण्यात आलेला ५८० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ कोठुन व कोणाकडुन आणला याबाबत तपास करीत असताना , आरोपी क्र . ०१ नामे चेतन मारुती मोहोळ याने निवेदन केले की त्याने सदरचा गांजा हा पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसरात गांजाची शेती असल्याची गोपनीय माहिती पुणे शहर अमली पदार्थ विरोधी पथकाला दिनांक २२/१०/२०२१ मिळाली होती.त्यानुसार तपास करुन पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील आंबेटवेट गावातील गवळीवाडा येथील एका घरावर छापा टाकला. पोलिसांनी घरातून 18 किलो गांजा जप्त करुन या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये शेतात तब्बल 250 गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे समोर आले आहे.
साहेबा हुलगप्पा म्हेत्रे (वय-20) चेतन मारुती मोहोळ (वय-27 रा. कोथरुड) यांना पहिल्यांदा सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशी प्रकाश वाघोजी खेडेकर (वय-35) व इंदुबाई खेडेकर (वय-65) यांची नावे समोर आली. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात होत असलेल्या गांजा तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गांजाची तस्करी करणाऱ्यांची माहिती घेतील जात आहे. याच दरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरक्षक विनायक गायकवाड यांना हद्दीत गस्त घालत असताना कोथरुड परिसरात दोन जणांकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून चेतन आणि साहेबा या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे अर्धा किलो गांजा सापडला. याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी मुळशी तालुक्यातील आंबेटवेट गावातून गांजा आणल्याची माहिती दिली.त्यानुसार पोलिसांनी गावात जाऊन तपास केला असता गवळीवाडा येथील खेडेकर कुटुंबाकडे गांजा असल्याचे समजले.
पोलिसांनी खेडेकर यांच्या घरावर छापा टाकून 18 किलो गांजा जप्त केला.त्यांनी हा गांजा दोघांना विकला होता. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गांजाची शेती दाखवली.शेतीची पाहणी केल्यानंतर आरोपींनी मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली.असे एकुण ०४ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत . दाखल गुन्हयाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक -१ चे पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड हे करीत आहेत . सदरची उल्लेखनीय कामगिरी.पोलीस आयुक्त , पुणे शहर , अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त , डॉ.रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , गुन्हे शाखा , पुणे ,पोलीस उप आयुक्त ,श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , सहा पोलीस आयुक्त , गुन्हे – २ लक्ष्मण बोराटे यांचे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक – १ व २ , गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड , पोलीस निरीक्षक , प्रकाश खांडेकर , सहा.पो.निरीक्षक , लक्ष्मण ढेंगळे , पो.उप निरीक्षक , दिगंबर चव्हाण , पोलीस अंमलदार , सुजित वाडेकर , संदिप जाधव , मनोज साळुंके , मारुती पारधी , पांडुरंग पवार , प्रविण उत्तेकर , विशाल दळवी , संदेश काकडे , विशाल शिंदे , नितेश जाधव , योगेश मोहिते , रेहना शेख , संतोष देशपांडे , प्रशांत बोमादंडी , मयुर सुर्यवंशी , चेतन गायकवाड , साहिल शेख , आजिम शेख , योगेश मांढरे , नितीन जगदाळे , युवराज कांबळे , संतोष जाचक , महेश साळुंके , दिशा खेवलकर यांनी केली आहे