श्रीगोंदा:- तालुक्यातील शिरसगाव येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून लसीकरण केले जात असून जिल्हा परिषद शाळेत सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.नगर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव येथे लसीकरण केंद्रावर कर्तव्यावर असलेले आरोग्य कर्मचारी बनसोडे यांनी लस घेण्यासाठी गेलेल्या मढेवडगांव येथील नागरिकांशी “जा तुम्हाला लस देणार नाही कोणाला सांगायचे ते सांगा”अशा प्रकारे उद्धट भाषेत अरेरावीची भाषा केली.कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लस टोचून घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अशा या वागणुकीमुळे लस घेणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे.बनसोडे यांची बोलण्याची भाषा अतिशय उद्धट असल्याचे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे