पुणे, दि १७:- पुणे शहरातील एका भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडे खंडणीची मागणी कलेल्याचा प्रकार समोर आला आहे.हनीट्रॅपमध्ये अडकवून 5 लाखांची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील लाचखोर पत्रकारासह चार जणांच्या टोळीला पुणे शहर हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे सीबीआय अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र पोलिसांना सापडले असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे. आरोपी हे यु ट्युन न्युज चॅनेल व संघटनेच्या नावाखाली ब्लॅकमेल केले.होते पोलिसांनी शिवप्रहार संघटेनेचा अनिल जगन्नाथ बोटे (वय-34 रा. तुकाई टेकडी, हडपसर), महाराष्ट्राचा प्रहार न्यूजचा राहुल मच्छींद्र हरपळे (वय-33 रा. चंदवाडी जुन्या कॅनाल शेजारी, फुरसुंगी), संतोष उर्फ शिवा उत्तम खरात (वय-26 रा. कामठेमळा, सम्राट गार्डन समोर, हडपसर मुळ रा. मु.पो. वाकडी ता. राहता जि. नगर), स्वप्नील विजय धोत्रे (वय-24 रा. फ्लॅट नं.504, छाया निवास, शिवशंभोनगर, व्हीआयआयटी कॉलनी मागे, कोंढवा, मुळ रा. मु.पो. उत्तर जेवळी ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), मारुती लहु निचीत (वय-39 रा. वडनेर खुर्द, ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिलीप मेमाणे (वय-38 रा. जेजुरी) या भाजी विक्रेत्याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीच्ये स्वप्निल धोत्रे याने शुक्रवारी (दि.10 सप्टेंबर) फोन केला. त्याने फिर्यादी यांना पबमध्ये बोलावून घेतले. त्याच्यासोबत राहुल हरपळे व दोन मुलींना घेऊन ते कोरेगाव पार्क येथील एका पबमध्ये गेले. त्याठिकाणी अनिल बोटे हा आगोदरच आला होता. पबमध्ये आल्यानंतर एका मुलीने फिर्यादी यांच्यासोबत जवळीक साधली. यानंतर ते सर्वजण तेथून निघाले. वाटेत त्या मुलीने पावभाजी खाल्ली. त्यानंतर ते दोघे एका लॉजवर गेले. त्याठिकाणी त्यांच्यामध्ये शरीरसंबंध झाला.
दोन दिवसांनी म्हणजे 12 सप्टेंबरला राहुल हरपळे, अनिल बोटे, स्वप्निल धोत्रे व एक मुलगी फिर्यादी यांच्या दुकानात आले. त्यावेळी अनिल बोटेने तू संबंधित मुलीवर बलात्कार केला आहे. आम्ही तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद देणार आहोत. जर फिर्याद करायची नसेल तर पाच लाख रुपये दे, अशी मागणी केली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी अनिल बोटे याला समजावून सांगण्यासाठी राहुल हरपळे याच्या हडपसर येथील मेगा सेंटरमधील ऑफिसमध्ये गेले.त्याठिकाणी अनिल बोटे याने पैसे आणले नाहीत यावरुन फिर्यादी यांना शिवीगाळ केली.तसेच त्यांच्या डोक्यात खुर्ची मारली. तर मारुती निचीत याने आपण सीबीआय आधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवले.तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो आणि माझ्या संघटनेची तुला ताकद दाखवतो अशी धमकी दिली.घाबरलेले फिर्यादी हे घरी आले. घरी आल्यानंतर फिर्यादी यांना स्वप्निल धोत्रे याने फोन करुन सांगितले की,बोटे हा तुझ्या विरोधात तक्रार देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेला आहे.तसेच तो महाराष्ट्राचा प्रहार या वेब पोर्टलवर बातम्या देऊन लोकांची बदनामी करुन खंडणी उकळत असल्याचे उघड झाले आहे
हे समजल्यावर फिर्यादी स्वत: पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.ही घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने लोणी काळभोर पोलिसांनी हा गुन्हा हाडपसर पोलिसांकडे वर्ग केला.
हडपसर पोलिसांनी केलेल्या तपासात राहुल हरपळे याने मारुती निचीत याच्यासह आणखी 5 लोकांना पत्रकार आणि सीबीआय अधिकाऱ्याचे बनावट आयकार्ड बनवून दिल्याचे समोर आले आहे.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम पोलीस निरीक्षक गुन्हे राजु अडागळे दिगंबर शिंदे यांच्या सुचनेनुसार,तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पोलीस उप निरीक्षक सौरभ माने
पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, गणेश क्षीरसागर, पोलीस नाईक शशिकांत नाळे, सचिन जाधव, संदिप राठोड, समीर पांडुळे, आविनाश गोसावी, पोलीस शिपाई प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सुरज कुंभार, निखील पवार यांच्या पथकाने केली.