अंबड दि.१६ :- प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा खूनकेल्याची दुर्दैवी घटना अंबड येथे घडली
प्रियकराच्या मदतीने या महिलेने मुलाच्या तोंडात बोळे कोमबुन जीव घेतला चि दुर्दैवी घटना बुधवार रात्री अंबड घनसावंगी फाट्यावर उघड झाली आणि मुलगा हरवल्याचा बनाव केला. या संतापजनक प्रकारामुळे अंबड पुन्हा एकदा ढवळून निघत आहे. परवा बदनापूर तालुक्यात 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 60 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला होता. ही घटना ताजी असतानाच काल पुन्हा ही दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान अंबड पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसी ला ताब्यात घेतले आहे अंबड तालुक्यातील डावरगाव येथील शीतल विनोद उघडे वय 22 वर्षीय विवाहित महिला तिच्या जावाला उपचारासाठी अंबड येथे दवाखान्यात दाखल केल्यानंतर तिच्यासोबत तिचा सहा वर्षाचा मुलगा आदित्य देखील होता. औषध आणायचा बहाना करून दवाखान्यातून बाहेर पडली परुंतु सोबत असलेला मुलगा कुठेतरी थांबविण्याचे निमित्त करून या मुलाला तिथे बाजूला असलेल्या ऐक व्यक्तीस हवाली केले केल्यानंतर औषध आणण्याच्या निमित्ताने ही महिला दवाखान्याच्या बाहेर पडली, परंतु सोबत असलेल्या मुलाला कुठेतरी थांबवण्याचा बहाना करून तिने तिथे असलेल्या प्रियकराच्या हवाली केले. आणि हा प्रियकर अनोळखी असल्याचाही बनाव केला मात्र थोड्याच वेळात ती व्यक्ती मुलास गायब झाले त्यानंतर शीतल उघडे हिने मुलगा हरवल्याची अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली तसेच त्या व्यक्तीने दिलेला मोबाईल नंबर पोलिसांना दिला तक्रारी च्या आधारे पोलीस यंत्रणा तपास कामाला लागली पोलिसांनि तपास सुरु केल्यानंतर धकादायक बाबी पुढे आल्या पोलिसांनी शीतल उघडे हिने ज्या व्यक्तीकडे मुलाला थांबवले होते तो त्या महिलेचा प्रियकर असल्याचे पुढे आले त्यानंतर पोलिसांनी शीतल उघडे हिने दिलेल्या मोबाईल नंबरवरून प्रियकर नवनाथ जगधने याला ताब्यात घेतले पोलिसांच्या चौकशीं दरम्यान प्रेमामध्ये आडकाठी ठरत असल्याने पोटच्या मुलाचा खून केल्याची गोष्ट पुढे आली त्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री आदित्य उघडेचा मूर्तदेह घनसावंगी रस्त्यावरील ऐका नाल्याच्या जवळ हस्तगत केला आसता या मुलाच्या तोंडात बोळे कोंबले दिसलें प्रियकर नवनाथ जगधने त्याचा मित्र गणेश रोकडे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून शीतल उघडे हिला पोलिसांनी अटक केली
जालना जिल्हा, अंबड तालुका, प्रतिनिधी :- महेश बरगे