पुणे, दि.१६ :- पुणे शहरातील युवक कैलास झगडे यांचा जीवन प्रवास तसा खडतरच, घरची परिस्थिती जेमतेम, वडिल pmt मध्ये कंडक्टर म्हणून काम करायचे, लहानपनापासून आई वडिलांचे कष्ट त्यांनी जवळून बघितले, कधी कधी तर छोटया छोटया गोष्टींसाठी पैसे नसायचे, पण जिद्दीच्या जोरावर त्यांनी प्रगती केली.आई वडिलाना विमान आणि हेलिकॉप्टर मध्ये बसवण्याचे स्वप्न त्यांनी बघितले होतें.काही तरी वेगळे आणि मोठं काम करण्याचे ठरविले आणि कला क्षेत्राकडे वळाले. कला आणि ऑर्केस्ट्रा क्षेत्रात त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटवला.. कंपनी मध्ये काम करण्यापासून मराठी चित्रपट बनवण्यापर्यंत त्यांचा वेगळाच प्रवास आहे.कावड नावाचा चित्रपट बनविला, तसेच पॉपकॉर्न काकडी नावाची shortfilm खूप लोकांना आवडली, तसेच तेरे लिये हे गीत
बँकॉक मध्ये तर तुच घेना मनावर गीत सिंगापूर मध्ये शूट केले, तसेच वाटुळ आणि माझं नाव मराठी ही गीत वडगावशेरीमध्ये शूट केले. हे सर्व kz music या you tube च्या माध्यमातून लोकसमोर आणले. कला क्षेत्रात काम करताना तसेच समाज कार्य करताना आई वडिलांचा,विसर कधी पडू दिला नाही आईवडिलांना हेलिकॉप्टर मध्ये बसवण्याचे स्वप्न बघितले आणि ते पूर्ण देखील केले.यापूर्वी त्यांनी आईवडिलांना संपूर्ण भारत दर्शन केले आणि दुबईला देखील नेले..आईवडील हेच खरे दैवत असतात,जगात एकमेव निस्वार्थी व्यक्ती असतात, ते कधीच मुलांचा वाईट विचार करत नाहीत, मग याच्या त्याच्या मागे पळण्यापेक्षा त्यांचं बोट धरून चला तुम्हाला कोणाच्याही पाया पडण्याची गरज पाडणार नाही या गोष्टीचा सर्व तरुणांनी विचार करावा,आपल्या आई वडिलांना खूप जपलं पाहिजे, त्याच्या इच्छा स्वप्न पूर्ण केल्या पाहिजेत.असं मात कैलास झगडे यांनी व्यक्त केले.