कर्जत,दि.१७ :- दिनांक १६ रोजी कर्जत पोलीस स्टेशनच्या दर्शनी भागात पत्रकार,व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलीस कर्मचारी तसेच थेरगाव ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक व ग्रामस्थांच्या सहभागातून पोलीस स्टेशनच्या समोरील बाजूस मेन रोड लगत झाडे लावण्यात आली. कर्जत तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायतीने 2021 22 या चालू वर्षी माझी वसुंधरा अभियानात भाग घेतलेला असून थेरगाव ग्रामपंचायत च्या वतीने थेरगाव सह तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयासमोर झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला असून या अभियानाअंतर्गत कर्जत पोलिस स्टेशन समोर कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सुचविले वरून थेरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कर्जत पोलीस स्टेशन समोरील दर्शनी भागात विविध प्रकारच्या चाळीस झाडांचे रोपण पत्रकार व पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे , पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, पत्रकार संघाचे सचिव निलेश दिवटे, खजिनदार मुन्ना पठाण, सल्लागार मच्छिंद्र अनारसे, जेष्ठ पत्रकार सुभाष माळवे, अफरोज पठाण तसेच थेरगाव ग्रामपंचायतचे शरद कवडे ग्रामसेवक ईश्वर जोगदंड पोलीस पाटील,रवींद्र महारनवर, सरपंच रामा शिंदे ,उपसरपंच
विठ्ठल ननवरे,बाळासाहेब महारनवर,मिनीनाथ शिंदे,तात्याभाऊ महारनवर आणि थेरगाव येथील ग्रामस्थांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले करण्यात आले.सदर झाडे पोलीस प्रशासन व पत्रकार आणि थेरगाव ग्रामस्थ यांच्या हस्ते लावण्यात आले असून सदर झाडांमुळे पोलीस स्टेशनचा परिसर अधिक शोभून दिसणार असल्याची भावना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमोल जाधव त्यांनी सांगितले. थेरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड करण्यास मदत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी थेरगाव च्या सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थां अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली व त्यांचे आभार मानले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे