पुणे,दि.०४ :- पुणे मंडई विभागामार्फत महात्मा फुले भाजी मंडई परिसरात अतिक्रमणावर कारवाई करत असताना व्यावसायिकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. संबंधितावर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महात्मा फुले मंडई शेतीमाल व्यापारी संघटना अध्यक्ष राजाभाऊ कासुर्डे यांनी पालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.या वेळी शहरातील रस्ता, पथावरील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.दि.४/८/२०२१ रोजी पुणे महानगरपालिका उप आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली व उपस्थिती मध्ये पुणे शहरात रस्ता /पथावरील अनधिकृत अतिक्रमनावर कारवाई करण्यात आली सदर कारवाई मध्ये ,हातगाडी-१४,पथारी-८१,शेड-३,इतर-१६. कारवाई ठिकाण-धानोरी रोड, , एअर पोर्ट रोड,कळस, बाणेर डी पी रोड,बालेवाडी,भोसले नगर,सेनापती बापट रोड, F C रोड, शिमला ऑफिस, गणेश खिंड रोड, राजभवन रोड ,पुणे मुंबई हायवे,सिंहगड रोड, पान मळा,गुलाबराव ताठे पथ, समर्थ पथ, वारजे सर्व्हिस रोड, सोलापूर रोड, अप्पर,सुप्पर, शांतीनगर, बाजीराव रोड,लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, तुळशीबाग, रास्तापेठ भाजी मंडई,शिवाजी रोड, रामेश्वर चौक,स्वारगेट कॉर्नर, अप्पर,लुल्लानगर,सोनी वर्ल्ड इ. ठिकाणी कारवाई करण्यात आली.