कर्जत दि ०२:- कर्जत तालुक्यातील परीटवाडी येथील एका खासगी सावकाराकडून सचिन विलास पाटिल,रा.काळेवाडी,ता.कर्जत यांनी व त्यांच्या मित्रांनी व्यावसायिक कामाकरिता प्रत्येकी ६ लाख रुपये ५ टक्के व्याजाने घेतले होते.त्या सावकाराचे व्याज वेळेवर देत असताना पैशाची वेळेत परत फेड न झाल्याने त्या सावकाराने माझे मागे व्याजाचे पैसे आताच पाहिजे असा तगादा लावून १५ लाख रुपये किमतीची फॉर्च्यूनर गाडी एम.एच.१२के.डब्ल्यू.००२५ ही काही महिन्यांपूर्वी बळजबरीने ओढून नेली.त्यानंतर कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत तालुक्यातील विनापरवाना चालणारे खासगी सावकारकी व्यवसायाबाबत नागरिकांना बिनधास्तपणे पुढे येऊन तक्रार करा असे आवाहन केल्याने राशीन नजीक राहणारे सचिन विलास पाटिल,रा. काळेवाडी,ता.कर्जत,जिल्हा अहमदनगर यांनी दि.२६ जून रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे आपली तक्रार दाखल केली.त्यानंतर लगेचच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तक्रारीची दखल घेत राशीन पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ,पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते,पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे,सागर म्हेत्रे,संपत शिंदे अशांना सदरची हकीकत सांगून तात्काळ त्या सावकारास कर्जत पोलीस स्टेशनमध्ये बोलवा असा तोंडी आदेश केल्याने वरील पोलीस स्टाफ त्या सावकारास पोलीस स्टेशन येथे बोलावून समक्ष हजर करून समज दिल्यानंतर मी त्याची गाडी तात्काळ परत करतो असे कळविले आणि सदरची गाडी तात्काळ परत केली.सदरच्या कारवाईमुळे कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलीस स्टाफचे सर्वत्र कौतुकाचा वर्षांव होत आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ,पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे,सागर म्हेत्रे,संपत शिंदे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे