पुणे दि २३ :-पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत ‘पदोन्नती’’ हा कोणत्याही सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा व आनंदाचा क्षण असतो. अशाच प्रकारे पोलीस दलामध्ये वयाच्या विशीत पोलीस शिपाई या पदावर भरती झालेला पोलीस कर्मचारी त्याच्या सेवानिवृत्ती पर्यत 24 ͯ 7 कर्तव्यावर असतो. या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देताना तो कुटूंब व अनेक कौटूंबिक क्षणांपासून दूरचं असतो. त्या स्थितीत प्रामाणिक ,शौर्याने चांगले कर्तव्य बजावून तो आपला सेवापट चांगला राखत असतो. आणि तो पदोन्नतीची वाट पाहत असतो. यामुळे त्याला त्यांनी केलेल्या चांगल्या सेवेची पोहोच त्याचप्रमाणे त्याच्या वेतनातही वाढ होते असते त्यामुळे तो आपले व आपल्या कुटुंबाचे राहणीमान चांगले ठेवू शकतो.पोलीस आयुक्त पुणे शहर.अमिताभ गुप्ता यांचे सुचनेनुसार पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर पोलीस दलामध्ये आस्थापनेवर कार्यरत असलेले पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार दर्जाचे पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यासाठी.अपर पोलीस आयुक्त प्रशासन डॉ.जालिंदर सुपेकर,पोलीस उपआयुक्त मुख्यालय श्रीमती स्वप्ना गोरे, मा.सहा.पोलीस आयुक्त आस्थापना.मच्छींद्र चव्हाण , प्रशासकीय अधिकारी श्रीमती शशिकला भालचिम यांची समिती स्थापन करण्यात आली. सदर समितीचे वतीने पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार या पोलीस अंमलदार यांना आज दि.23/06/2021 रोजी पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये 200 पोलीस हवालदार यांना सहा.पोलीस फौजदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. 249 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर 126 पोलिस शिपाई यांना पोलीस नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. अशा प्रकारे पुणे शहर पोलीस दलातील 575 पोलीस अमंलदार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यापुर्वी यावर्षामध्ये फेबु्वारी व एप्रिल मध्ये पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस 172 अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली होती. कोविड-19 मुळे सदर पदोन्नती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणात पुणे शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली आहे.सदर पदोन्नती झालेले पोलीस अंमलदार यांना मा.पोलीस आयुक्त.अमिताभ गुप्ता.सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे.अपर पोलीस आयुक्त प्रशासन डॉ.जालिंदर सुपेकर .पोलीस उप-आयुक्त मुख्यालय पुणे शहर श्रीमती स्वप्ना गोरे व इतर पोलीस अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.