श्रीगोंदा दि २० :-खासदार राहुल गांधी यांचा १९ जून रोजी ५१ वा वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावात जाऊन किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरुप न देता गोरगरिब जनतेला रेशन,अन्नधान्य तसेच कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदत करण्याचा संकल्प काँग्रेसने केला असल्याची माहिती अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव हेमंत ओगले यांनी दिली.
मागील दीड वर्षांपासून देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या कोरोनाने शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले. कोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुलजींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाही. हे लक्षात घेऊन राहुलजींचा वाढदिवस हा साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.गरजूंना ‘किराणा किट’ चे वाटप लॉकडाऊन जरी अंशतः खुलला असला तरी रोजगार अद्याप पूर्णपणे सुरू झाला नसल्याने गरिबांची आणि विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाची उपासमार होत आहे. यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील युवक काँग्रेसचे अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव हेमंत ओगले व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले यांनी पुढाकार घेत गरजूंसाठी अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किट चे वाटप करण्याचा कार्यक्रम युवक काँग्रेसने हाती घेतला आहे.
हेमंत ओगले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की,कोरोना संकटाला सामोरे जाणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. राहुल गांधींचा वाढदिवस हा आमच्यासाठी एक खास प्रसंग आहे आणि या निमित्ताने आम्ही ‘किराणा किट’ श्रीगोंदा तालुक्यातील गोर-गरिबांना देण्याचा प्रयत्न करत आहोत.
यावेळी अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव हेमंत ओगले,श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत दादा गोरे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले,तालुका काँग्रेसचे युवक अध्यक्ष डॉ.गोरख बायकर, शहराध्यक्ष योगेश मेहेत्रे, वडाळी गावचे सरपंच महेश दरेकर,नितीन खेड़कर,सुभाष दिवटे ,गोरख ढगे,विश्वजीत खेडकर,आप्पा नवले,सुहास घोडके,सुरज राऊत, शेख जहीर सय्यद,सचिन जंजिरे,रोहन झिटे,हेमंत झिटे,सुरज गाडे, बॉबी दिवटे,ओमकार उदमले,काळू कुचेकर,वैभव झिटे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे