श्रीगोंदा दि १४ :-पोलीस असल्याची बतावणी करून ट्रक चालकास लुटणाऱ्या एका तोतया पोलिसाला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली.
अबालु जाफर ईरानी वय ४७ वर्षे,रा.शिवाजीनगर,ता. जि. पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.ही घटना दौंड ते अहमदनगर कडे जात असताना निमगाव खलु जवळ शांताई लॉन्स समोर तीन अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल वरुन येवुन आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एम.पी.०९ आय.एफ.९४३५ हा रोडच्या कडेला थांबवुन चालकास बोलण्यात गुंतवुन आम्ही पोलिस आहोत असे भासवून एकाने टेम्पोतील क्लिनर साईडने आत मध्ये शिरून सीटखाली ठेवलेले फिर्यादीचे रोख रक्कम २७ हजार रुपये चोरुन नेले होते.याप्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी लखन दशरथ नायर वय २१ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर रा. बागवा ता.जि.खरगोन (मध्यप्रदेश)यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
त्या अनुशंगाने दि.११जून रोजी गुन्ह्यातील आरोपीपैकी एक आरोपी मोटार सायकलवर काष्टी मध्ये आल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार त्याचा पाठलाग श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत असताना त्याने आपली मोटार सायकल मांडवगण कडे जाताना मांडवगण चौकी शिरुर पो.स्टे. कर्मचा-यांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले.त्याचेकडे अधिक सखोल विचारपुस करुन तपास केला असता त्याने त्यांचे दोन साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली त्याचे कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी आठ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली यमाहा एफ झेड कंपनीची मोटार सायकल क्र. एम.एच.१४ जे.जे.५०६७ ही ५० हजार रुपये असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,स.पो.नि दिलीप तेजनकर,पो.हे.कॉ अंकुश ढवळे, पो.ना मुकेश बडे, पो.कॉ प्रकाश मांडगे,पोकॉ किरण बोराडे,पो.कॉ दादा टाके, पो.कॉ गोकुळ इंगवले, पो.का प्रताप देवकाते,पो.कॉ.कुलदिप घोळवे, पो.कॉ योगेश दळवी,पो.कॉ अमोल कोतकर यांनी केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पो.ना संतोष फलके हे करीत. आहेत
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे