पुणे दि१४ :- पुणे आणि नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सदर मोटारसायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १३जुलै२०२१ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जुन्नर तालुक्यातील खोडद या गावात काही इसम कुठल्याही प्रकारचा कामधंदा न करता वारंवार विविध कंपनीच्या मोटारसायकल वापरत आहेत.पोलीस खोडद या गावी गेल्यानंतर त्यांना पोलीसांची चाहूल लागताच पळून जाऊ लागले असता पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिली त्यांची अजून सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील विविध कंपनीच्या ११ मोटारसायकल ह्या चोरी करून आणल्या असल्याचे सांगितले.
सिद्धार्थ रमेश बर्डे वय २१ रा. खोडद ता. जुन्नर जि. पुणे आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक असे आरोपींचे नावे आहेत.
चौकशी दरम्यान त्याने पुणे आणि नगर भागात चोरी केलेल्या इतर मोटारसायकलीची माहिती दिली.त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपींकडून ४,१०,००० रु.किमतीच्या एकूण ११ मोटारसायकल जप्त केल्या असून ८ गुन्हे उघडकीस आणले आहे. आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील कारवाई साठी नारायणगाव पो.स्टे च्या ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख उप.विभा.पो.अधिकारी मंदार जवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे आदेशाने स.पो.नि.नेताजी गंधारे,पो.हवा.विक्रम तापकीर,पो.हवा.सचिन गायकवाड,पो.ना दीपक साबळे
पो.शि.संदीप वारे,पो.शि.अक्षय नवले,पो.शि.निलेश सुपेकर,पो.हवा.मुकुंद कदम यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे