कर्जत: दि १३ :-घरात चोरी झाली की, आपला चोरीला गेलेला मुद्देमाल मिळतच नाही, अशी काहीशी धारणा नागरिकांमध्ये असते. मात्र कर्जत पोलिसांनी थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल १२ लाख २० हजार ९६६ रुपये किंमतीचा चोरी गेलेला ऐवज परत मिळवून दिला आणि या फिर्यादी महिलेच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. फिर्यादी महिलेच्या डोळ्यातून तर आनंदाश्रूही ओघळले. १२ लाख २० हजार ९६६ रुपयांचा मुद्देमाल परत देणाऱ्या पोलिसांचे महिलेने मनोमन आभार मानले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ५ मे२०२१ रोजी मीना सर्जेराव महानवर यांच्या घरात धाडसी दरोडा पडला. रात्रीचे जेवण करून कुटुंबासह सर्वजण घरामध्ये झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात जिन्यामधून प्रवेश केला व मीना महारनवर आणि घरातील कुटुंबीयांना मारहाण करत घरातील कपाटामध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १५ लाख रुपये किमतीचा ऐवज दरोडा आणि घरफोडी करून चोरून नेला होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्याची संशयाची सुई बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिखली येथील एवन काळे याच्याकडे वळली. पोलिसांना हा गुन्हा एवन काळे याने व त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार एवन काळेच्या घरावर अचानक छापा घालून गुन्ह्यातील चोरी गेलेला सर्व माल ताब्यात घेऊन ४ आरोपीना अटक करण्यात यश आले.ही कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील पाच पथके तयार करून करण्यात आली. या पथकामध्ये पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव अनिल कटके, सहाय्यक निरीक्षक सुरेश माने, फौजदार अमरजीत मोरे, पोलीस जवान सुनील चव्हाण, अंकुश ढवळे, सुनील खैरे, श्याम जाधव, महादेव कोहक, रवींद्र वाघ, जितेंद्र सरोदे, गणेश आघाव, कोमल गोफणे, शाहूराज तिकटे यांचेही पथक होते.तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, दत्तात्रय इंगळे, विश्वास बेरड, ववन मखरे, सचिन आडवल, सुनील चव्हाण, सुरेश माळी, विशाल दळवी, दिनेश मोरे, शंकर चौधरी, राहुल सोळंकी, सागर ससाने, रवींद्र घुंगासे, रणजित जाधव, सागर सुलाने, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, आकाश काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अंकुश ढवळे यांची दोन पथके होती.
तर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयातील संग्राम जाधव, अरुण पवार, सचिन राठोड, संदीप राऊत यांचे एक पथक आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील दादासाहेब टाके, किरण बोराडे, गोकुळ इंगवले यांचे एक पथक अशी मिळून पाच पथके तयार करण्यात आली होती.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ कायदेशीर प्रक्रिया पार पाडून सदर गुन्ह्यातील माल फिर्यादीला परत केला.फिर्यादी महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे