पुणे : -पुणे शहरात औंध येथील सिंध हौसिंग सोसायटीत एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी केअर टेकर ब्युरोमार्फत काम करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घराची रेकी करून दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन मधील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी या टोळीला काही दिवसा पूर्वी अटक केली होती. संदीप भगवान हांडे (वय 25),मंगेश बंडू गुंडे (वय 20),राहुल कैलास बावणे (वय 22),विक्रम दीपक थापा उर्फ बीके (वय 19),किशोर कल्याण चनघटे (वय 21) आणि भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय 25) यांच्याविरूध्द मोक्का कारवाई करण्यात आली आहे.पुण्यातील औंध येथील सिंध हौसिंग सोसायटीत घुसून उच्चभ्रू बंगल्यातील ज्येष्ठ दांपत्यालाआणि त्यांच्या कुकला चाकूचा धाक दाखवून 15 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल केला होता.या गुन्ह्याचा तपास करत या सहा जणांच्या टोळीला औरंगाबाद, जालना, आणि नाशिक या तीन शहरातून अटक केली होती.त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले होते.
संदीप हांडे हा टोळी प्रमुख आहे. तो आणि त्याच्या टोळी सराईत गुन्हेगार असून या टोळीवर औरंगाबाद, जालना आणि पुण्यात यापूर्वीचे सात गुन्हे दाखल आहेत.आरोपी आधी केअरटेकर म्हणून संबंधित घरात जाऊन घराची रेकी करत आणि त्यानंतर दरोडे टाकत असल्याचे समोर आले होते.या टोळीवर मोक्का लावण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे पाठ्वला होता,त्यांनी याबाबत पाहणी करून तो अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठवला.त्यांनी छाननी करून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार या टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास रमेश गलांडे , सहायक पोलीस आयुक्त , खडकी विभाग पुणे शहर हे करीत आहेत . सदरची उल्लेखनिय कामगिरी.पोलीस आयुक्त ,अमिताभ गुप्ता पुणे शहर ,पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर ,पोलीस उप आयुक्त.पंकज देशमुख , परिमंडळ -०४ , पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा.सहा.पोलीस आयुक्त.रमेश गलांडे खडकी विभाग , पुणे शहर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक.राजकुमार वाघचवरे चतुःश्रृंगी पो.स्टे पुणे , पोलीस निरीक्षक गुन्हे ,दादासाहेब गायकवाड , पोलीस उप – निरीक्षक प्रेम वाघमोरे , महेश भोसले , मोहनदास जाधव ,पी.एस.आय वाघमोरे, पो. हवालदार संतोष डोळस.पो. शिपाई अमित गद्रे,पो. शिपाई अमित छडीदार,अमलदार , संतोष डोळस , अमित गद्रे , अमित छडीदार , सुधीर माने , इरफान मोमीन , श्रीकांत वाघवले , प्रमोद शिंदे , संतोष जाधव , तेजस चोपडे , मुकुंद तारू , दिनेश गडाकुंश , प्रकाश आव्हाड , ज्ञानेश्वर मुळे यांचे पथकाने केली आहे . .पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचाली वर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत . त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ३४ वी कारवाई असुन या वर्षातील ही २९ वी कारवाई आहे .