पुणे : – पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील जागेची नोंद सातबारा उताऱ्यावर करून घेण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यासह खासगी व्यक्तीवर पुण्याच्या लुचपत प्रतिबंधक विभागा यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अविनाश केवलसिंग जाधव (वय 32, रा. शिरूर) व पंडित उमाजी जाधव (वय 32) असे गुन्हा करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी क्रमांक २ यांचेकडे देण्यास सांगितली , त्यास आरोपी क्रमांक २ यानी सहाय्य करून तक्रारदार याचेकडे लाच रक्कम मागीतली म्हणून याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अविनाश हे तलाठी शिक्रापूर सजाचे तलाठी आहेत.यादरम्यान यातील तक्रारदार यांनी पत्नीच्या नावावर शिक्रापूर येथे एक गुंठा जागा घेतली आहे.या जागेची नोंद करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता.त्यावेळी लोकसेवक अविनाश यांनी सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी 30 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.त्यानंतर याची पडताळणी केली. त्यात तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच खासगी व्यक्ती पंडित यांच्या सांगण्यावरून मागणी केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचे तपासकामी मा . न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे . तपास श्रीमती अलका सरग , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट या करत आहेत .सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक. राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व . अपर पोलीस अधीक्षक . सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांक वर१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४. सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले
्