कर्जत दि 03 :- घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून,अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील ५ पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.कर्जत पोलिसांकडून आरोपीस मोठ्या शिताफीने अटक करून धाडसी कारवाई केली आहे. दि. १८ एप्रिल रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे शिवाजी मोहन दंडे यांनी फिर्याद दिली होती की, रात्री कोणीतरी अज्ञात चोरटयाने कडी कोयंडा तोडून त्यांचे घरात प्रवेश करुन घरातील कपडे , सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेली आहे. अशी फिर्याद दिल्याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव साहेब यांनी सदरचा गुन्हा उघड करणे बाबत अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन मार्गदर्शन केल्याने सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी व त्यांचे गुन्हेशोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्हा उघडकीस येणे करीता कासोशीने प्रयत्न करत होते. दरम्यान गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली सदरची घरफोडी ही नवनाथ ऊर्फ अंडया देवीदास भोसले, सध्या रा. येडेवस्ती, खोरवडी,ता.दौण्ड, पुणे याने केली आहे. त्यानुसार आरोपीस पहाटे कोंबीग ऑपरेशन करुन दौण्ड पोलीसाच्या मदतीने त्याच्या राहते घरी खोरवडी येडे वस्ती ता.दौड जि.पुणे येथे त्यास कर्जत पोलीसाच्या पथकाने ताब्यात घेतले.या आरोपीस ताब्यात घेत असताना धारदार चाकु घेउन पळ काढला व पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर चाकुचा वार करण्याचा प्रयत्न करून अटक टाळण्याचा प्रयत्न केला असता त्यास कर्जत पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या घराची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे घरात घरफोडी करण्याचे साहीत्य कटावणी, प्राणघातक हत्यारे त्यामध्ये चार धारदार चाकु मिळुन आले.कर्जत येथील घरफोडी मध्ये चोरी करुन नेलेला घागरा चोळी साडया व रोख रक्कम ५ हजार रुपये मिळुन आले आहेत. तसेच होण्डा कंपनीची एच एफ डिलक्स मोटर सायकल मिळुन आली.आरोपी विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन,कर्जत पोलीस स्टेशन,पाथर्डी पोलीस स्टेशन,कर्जत पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस स्टेशन आदी पोलिस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.आरोपी कडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.आरोपीने आणखी किती गुन्हे केले तसेच त्यास आणखी गुन्हे करण्यास कोणी मदत केली याचा तपास कर्जत पोलीस करत आहे .सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार सलिम शेख , अंकुश ढवळे, मारुती काळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, संपत शिंदे, महादेव कोहक, सचिन वारे, चालक शकील बेग, प्रशांत राठोड, महीला होमगार्ड सुषमा ननवरे यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे