पुणे ग्रामीण दि ०२ :- पुणे जाबरूग रेल्वे ट्रॅक येथे दि ३१/०५/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. दरम्यान लोणावळा स्टेशन मास्तर रेल्वे स्टेशन यांनी लोणावळा लोहमार्ग दूरक्षेत्राकडील लोहमार्ग पोलीस , पुणे यांना कळविले की , जाबरूग रेल्वे ट्रॅक कॅबीन रे.कि.मी.नं. १०६/१२ ते १४ दरम्याण रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक महिला जखमी अवस्थेत पडलेली आहे व पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सदानंद गं वायसे पाटील यांना समजली . त्यांनी लगेच तत्परता दाखवत लोणावळा लोहमार्ग दूरक्षेत्र , पुणे कडील पोलीस उप निरीक्षक गोसावी व पोलीस नाईक व जाधव यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करू जखमीस तात्काळ वैदयकीस उपचार मिळवून देण्याचे आदेश दिले . त्याप्रमाणे लोहमार्ग दूरक्षेत्राकडील पोलीस नाईक जाधव व चार हमाल असे कर्जत रेल्वे स्टेशनकडे जाणा – या रेल्वे मालगाडीच्या इंजिनमध्ये बसून घटनास्थळी रवाना झाले . तोपर्यंत लोहमार्ग पुणे जिल्हयाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कर्जत लोहमार्ग पोलीस ठाणे हे घटनास्थळावरून जवळ असल्याने कर्जत रेल्वे स्टेशन येथे संपर्क करून तात्काळ जखमीस मदत मिळणेबाबत संपर्क केला . त्यामुळे कर्जत लोहमार्ग पोलीस ठाणे कडील पोलीस नाईक गांगुर्डे , पोलीस शिपाई तुर्डर , पोलीस शिपाई गायकवाड व एक गार्ड असे घटनास्थळी पोहचले . तेथे काहीएक वाहतुकीचे साधन नसतांना देखिल सदर कर्मचारी यांनी जखमी महिलेस झोळीमध्ये उचलुन खांदयावर घेवून तब्बल ४ कि.मीटर अंतर पायी चालत पार केले . त्यानंतर पळसदरी रेल्वे स्टेशन येथे अॅम्ब्युलन्समध्ये घालुन जखमी महिलेस कर्जत येथे प्राथमीक आरोग्य केंद्र येथे नेले व लोहमार्ग पुणे पोलीस दलाचे पोलीस नाईक जाधव हे देखिल तेथे पोहचले . सदर जखमी महिलेस मनक्याला मार लागल्याने पुढील उपचारकामी तात्काळ ससुन हॉस्पीटल , पुणे येथे आंतररूग्ण म्हणुन दाखल करून औषधोपचार सुरू केले . जखमी महिलेस तातडीने उपचार झाल्याने जखमी महिलेलेची तब्बेत आता ठणठणीत आहे . सदर जखमी महिलेस तिचे नाव , गाव बाबत विचारता तीने आपले नाव व वय ४२ वर्षे , राह . थेरगाव , फनसावाडी , कार्ला , ता . मावळ जि . पुणे असे सांगीतले असून तीने दिलेल्या माहितीवरून तात्काळ वारसांशी संपर्क करून जखमी महिलेचा मुलगा. सदर हे देखिल ससुन हॉस्पीटल , पुणे येथे हजर झाले . जखमी महिलेकडे घटनेबाबत तपास केला असता त्यांनी सांगीतले की , त्या रेल्वे रूळ कॉस करताना त्यांना कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीची धडक लागल्याने त्यांच्या मनक्याला मार लागुन त्या गंभीर जखमी झाल्या होत्या . त्यांना रेल्वे पोलीसांच्या तत्परतेने केलेल्या मदतीमुळे तात्काळ उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले . जखमी महिलेची सदर घटनेबाबत कोणाविरूध्द काहीएक तकार नाही किंवा सदरचा प्रकार हा घातपाताचा प्रकार नसल्याचे देखिल प्राथमीक तपासादरम्यान स्वष्ट झाले आहे . तसा जखमी महिलेचा सविस्तर जबाब घेतला असून सदर जखमी प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहे . सदर घटनेबाबत लोहमार्ग पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सदानंद गं . वायसे पाटील , अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर – पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी , लोहमार्ग पुणे विभागाचे श्रीकांत क्षिरसागर यांचे मार्गदर्शणाखाली पुणे लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस . आर . गौड , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) एस . एल . रोकडे – साळुके यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक गोसावी , पोलीस नाईक जाधव व कर्जत लोहमार्ग पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक श्री . सरकाळे , पोलीस नाईक गांगुर्डे , पोलीस शिपाई तुर्डर , पोलीस शिपाई गायकवाड व एक होमगार्ड यांनी केली आहे . सदर बाबत लोहमार्ग पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे .