पुणे दि ०२ :- वडगाव शेरी परिसरात चारित्र्याच्या संशयचावरुन पत्नीचा गळा दाबून खुन करुन नंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार वडगाव शेरी येथे घडला. उषा योगेश गायकवाड (वय २८) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश तानाजी गायकवाड (वय ३३, रा. पिराजीनगर, माळवाडी, वडगाव शेरी) असे गळफास घेतलेल्या पतीचे नाव आहे.याबाबत चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश गायकवाड हा पत्नी व १० वर्षाच्या मुलीसह पिराजीनगर येथे एका पत्र्याच्या खोलीत रहात होता. योगेश गायकवाड हा लॉकडाऊन सुरु झाल्यापासून काही कामधंदा करीत नव्हता. उषा ही स्वयंपाकाची व धुणेभांडी करुन संसार चालवत होती. गेल्या काही दिवसांपासून योगेश हा उषा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.व
सोमवारी रात्री साडेदहा वाजता ते तिघेही जण टीव्ही पहात होते. त्यावेळी योगेश याने मुलीला तु जाऊन झोप असे सांगितले. त्यानुसार मुलगी शेजारच्या खोलीत जाऊन झोपली. कत्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास योगेश याने उषा हिचा गळा दाबून तिचा खुन केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ६ वाजता मुलगी उठली व तिने दरवाजा उघडल्यावर तिने वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. या मुलीने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना कळविला. ते घरी आले. त्यानंतर त्यांनी ही बाब पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. उषा गायकवाड हिच्या शवविच्छेदनात गळा दाबल्याने मृत्यु झाल्याचा अहवाल ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास अण्णा साहेब टापरे हे करत आहे