पुणे २९ :- पुणे महानगरपालिकेचे बानेर येथील कोव्हिड् सेंटरमधून ऑडमिन म्हणून कामगार महिलेनेच व साथीदाराच्या मदतीने मृत्यू झालेल्या रुग्णांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांनी सहा ते सात कोव्हिड रुग्णांचे दागिने चोरले आहेत.
याप्रकरणी अजयश्री म्हसकर (वय 25) यांनी तक्रार दिली आहे। त्यानुसार 36 वर्षीय कामगार महिला आणि साथीदार अनिल तुकाराम संगमे (35) या दोघांना अटक केली आहे.पुणे
महापालिकेचे बाणेर परिसरात कोव्हीड सेन्टर आहे. येथे संबंधित महिला काम करत होती. दरम्यान कोरोना सुरू झाल्यापासून येथे हे रुग्णालय सुरू केले आहे. काहींना ICU मध्ये दाखल केले जात असे.
यावेळी या महिलेने कोरोना गंभीर, ICU उपचार घेत असलेल्या रुग्णांचे 1 ते 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले. तर एकुण १ लाख३४ रूपयांचा मुद्दे माल चोरला आहे तर काही मृत झालेल्या रुग्णांच्या अंगावरील देखील दागिने चोरल्याचे समोर आले आहे. दागिने चोरल्यानंतर हे दागिने ती अनिल याच्याकडे देत असे. अनिल हा तिचा साथीदार आहे.
दरम्यान, काही रुग्णांनी रुग्णालय प्रशासनास हा प्रकार सांगितला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महिला गेल्या सप्टेंबर 2020 पासून येथे काम करत होती. मध्यंतरी रुग्ण कमी झाल्यानंतर या महिलेला 1 महिन्याचा ब्रेक दिला होता.व पुन्हा रुग्ण संख्या वाढली असता तिला कामावर बोलवण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक माळेगावे हे करत आहेत.