पुणे २९ :- पुणे शहरात जुगार खेळणाऱ्याची मुजोरी पाहिला मिळत असून, मार्केटयार्ड परिसरातील येथे उच्चभ्रू एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनाच चक्क पहाटेपासून ताटकळत उभा रहावे लागले आहे. तर शेवटी कुलूप तोडून पोलिसांनी या जुगार घेणाऱ्यांवर छापा टाकला आहे. यात मोठ्या प्रमाणात जुगार खेळणार्यांना पकडले असून, आज दि. 29 मे 2021 रोजी) पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आहे.
मार्केटयार्ड येथील विपुल बंगला, स.नं.५८९/बी विद्यानगर मार्केटयार्ड , पुणे येथे अवैधरित्या जुगाराचा अड्डा चालु असलेबाबतची गोपनीय बातमी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांना मिळाली असता त्यांनी सदर ठिकाणी खात्री करुन छापा कारवाई करणे बाबतचे आदेश श्रीमती अनघा देशपांडे , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , मार्केटयार्ड पोलीस स्टेशन , पुणे शहर यांना दिले . बातमीचे अनुशंगाने श्रीमती अनघा देशपांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील स्टाफ सह सदर ठिकाणी गेल्या असता विपुल बंगला या बंगल्याला बाहेरुन कुलुप लावलेले होते.परंतु सदर बंगल्याचे खिडकी मधुन आत पाहिले असता आतमध्ये १५ ते २० इसम असल्याचे पोलिसांना दिसुन आले.त्यावेळी त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी सांगितले की , आम्ही इसम नामे हर्षल पारेख रा.सदर याचे सांगणेवरुन सदर ठिकाणी जुगार खेळण्यासाठी आलो असुन आम्ही बंगल्याचे आतमध्ये जुगार खेळत असतांना आम्हाला हर्षल पारेख याने “ मी तुम्हाला जेवण आणुन देतो ” असे सांगुन तो बंगल्याला बाहेरुन कुलुप लावुन गेला आहे.सदर ठिकाणी जुगार खेळला जात असल्याची खात्री झाल्याने व तेथे छापा कारवाई करावयाची असल्याने सदरची बाब अनघा देशपांडे , वरीष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी.राजेंद्र गलांडे सहा.पोलीस आयुक्त , वानवडी विभाग , पुणे शहर व श्रीमती नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त , परीमंडळ ५ , पुणे शहर यांना कळवुन श्रीमती नम्रता पाटील साो , पोलीस उप आयुक्त परीमंडळ ५ पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस स्टाफ व सरकारी पंच यांचे समक्ष सदर बंगल्याचे कुलुप तोडुन सदर ठिकाणी सकाळी १०/४५ वा.छापा टाकला असता सदर ठिकाणी एकुण १९ पुरुष आरोपी मिळुन आले असुन या कारवाईत काही नामांकित व्यक्ती आणि राजकीय व्यक्ती असल्याची माहिती मिळाली आहे. तर मोठ्या प्रमाणात जुगार साहित्य आणि इतर मौल्यवान ऐवज मिळाला आहे.व
त्यांचे ताब्यातुन ५३ हजार ९०० रुपये रोख रक्कम , तसेच १ लाख रुपये किंमतीच्या ०४ मोटारसायकल असा एकुण १ लाख ५३ हजार ९ ०० रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे व इसम हे कोरोना संसर्गाचे काळात संचारबंदी आदेशाचे उल्लघन करुन विना मास्क जुगार खेळतांना मिळुन आले म्हणुन त्यांचेवर मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला आहे . सदरची कामगिरी पोलीस आयक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता , सह.पोलीस आयुक्त साो . डॉ . रविंद्र शिसवे ,अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर .नामदेव चव्हाण , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ , पुणे शहर श्रीमती नम्रता पाटील , .राजेंद्र गलांडे साो , सहा.पोलीस आयुक्त , वानवडी विभाग , पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती अनघा देशपांडे , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , मार्केटयार्ड पोलीस स्टेशन , पुणे शहर , पो उपनिरीक्षक संतोष शिंदे , पोउपनिरी अमोल कदम , पोउप निरीक्षक चेतन भोसले , पो.हवा.गोविंद गोरडे , निषाद कोंडे पो.ना.प्रशांत धोत्रे , वामन पडळकर , पो.शि.अमोल दबडे , श्रीशैल कोळी , प्रशांत मुसळे , सुनील पोळेकर , भिमराव कांबळे , अनीस शेख , स्वप्नील कदम , पांडुरंग भिलारे , राहुल औंधकर , बाळासाहेब गालफाडे , प्रमोद काटकर , अनिरुध्द आनेराव , प्रवीण धालपे , वैभव बधे , मकसुद तांबोळी , रोहित कणसे , आशिष यादव याचे पथकानेकेली आहे .