पुणे दि २७:- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने, राज्यात सरकारने सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचे संकेत देत कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य हातावरचे पोट असलेल्या नागरिकांचे खायचे वांदे झाले आहेत. त्यात पुणे परिसरात दुकानदार व व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लॉकडाउनच्या नावाखाली भरमसाठ लूट सुरू असून, जीवनावश्यक वस्तूंची व दारू, हॉटेल, पार्सल सेवा व ईतर वस्तूची मनमानीपणे किमतीने विक्री सुरू आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.कोरोना या महामारीचा सामना करण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याची खबरदारीसाठी प्रशासन सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. कोरोना या संकटांशी सर्वांनी एकमेकांना सहकार्य व धीर देऊन लढा द्यायची परिस्थिती असताना पुणे परिसरात किराणा दुकानदार तसेच वाईन शॉप, हॉटेल, बांधकाम साहित्य सहित ईतर विक्रीवाले यांच्याकडून लॉकडाउनच्या नावाखाली अनेक वस्तूंचे दर वाढवले असून महागाई गगनाला भिडले आहे.शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध करून आणखी काही दिवस देखील झाले नसताना, दुकानदारांनी भरमसाठ किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत आहे.संचारबंदीच्या काळात किराणा दुकानदारासह मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची गोडवानमध्ये दारू सह ईतर वस्तू चे भरगच्च साठेबाजी केली आहे. वस्तूंचा तुटवडा असल्याचे भासवत या वस्तूंची विक्री चढ्या दराने सुरू केली. तसेच बांधकामासाठी लागणारे साहित्यांची देखील तीच परिस्थिती असल्याने,व वाईन शॉप ने होम डिलिव्हरी च्या नावाखाली लूट नागरिकांची चोहोबाजूंनी गळचेपी झाली आहे. शासनाने वेळीच लक्ष देऊन नागरिकांची लूट करणाऱ्या दुकानदार व साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
अवैध धंदेवाल्यांचीही जोमात विक्री
पुणे परिसरातील काही झोपडपट्टी सह ईतर परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांसाठी कोरोना व लॉकडाउन हे फक्त निमित्तच हवे असते. कडक निर्बंध चालू होताच अवैध धंदेवाल्यांची खुलेआम विक्री जोमात सुरू होते. बेकायदेशीर विक्री होणाऱ्या दारूचेही दर वाढवले आहे तर ईतर व्यसन करण्याचे पदार्थ विक्रीतही वाढ झाल्याने दर वाढवले आहेत. याकडे पोलिसांचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
सोशल डिस्टन्सिंग नावाचे फज्जा
पुणे परिसरात रोडवर चालणाऱ्या वाहनासह सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकानांवर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. अशा सूचना वजा आदेश आहेत. मात्र, दुकानांवर, त्याचे पालन का होत नाही? याची पाहणी होते का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. दुकानदार म्हणतात आम्हाला होलसेलमध्ये पुरेसा व योग्य दरात किराणा साहित्याचा पुरवठा झाला तर, आम्हीही नेहमीच्या दरात ग्राहकांना विकू. त्यासाठी प्रशासनाने काही व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर आळा घातला पाहिजे. सध्याची अडचणीची स्थिती आम्हालाही कळते. परंतु, काही व्यापारीच साठा करून दर वाढवित आहेत. त्यामुळे त्यांचा आधी बंदोबस्त करा.
” दुकानदारांकडून दर वाढवून लोकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे तसेच वाईन शॉप चे दर जाहीर करून ते दुकानाबाहेर लावण्यासाठी बंधनकारक करावे. मालाची साठेबाजी केलेल्या व्यापाऱ्यांवर धाडी टाकून कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. ”