पिंपरी चिंचवड दि २० :- चिखली पोलिसांनी अट्टल रिक्षा चोरास अटक केले. त्याच्या ताब्यातून चोरीची रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. १ ) मंगेश शांताराम यादव वय -२१ वर्षे रा मुळगाव मु.पो.सुकडी साईबाबा मंदीरा जवळ , ता.कारंजालाड जि.वाशीम सध्या रा.चिखलीगाव कमानी जवळ चिखली पुणे २ ) शिवराज एकनाथ मोरे वय -३२ वर्षे रा.राममंदीरा शेजारी पाटीलनगर चिखली पुणे ३ ) अवधुत चंदसेन लवटे वय -२५ वर्षे रा . राममंदीरा शेजारी पाटीलनगर चिखली पुणे असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक १८ / ०५ / २०२१ रोजी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत वाहन चोरी प्रतिबंध करणेकामी सापळा लावून व पेट्रोलींग करत असताना पहाटे ०३.०० वा.चे सुमारास तुळजाभवानी मंदीर , टॉवर लाईन , मोरेवस्ती चिखली पुणे येथे आले असता एक रिक्षा जोरात निघुन जात असताना दिसल्याने त्यांना त्यांचा संशय आल्याने सदरची रिक्षा पाठलाग करून ताब्यात घेवुन सदर रिक्षा चालक व त्याचे दोन साथीदार यांचेकडे रिक्षाचे कागपत्रांची मागणी करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर इसमांना अधिक चौकशीकामी चिखली पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन त्यांना त्यांचे नावपत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे
असे असल्याचे सांगितले . त्यांचे ताब्यात मिळून आलेली रिक्षा नं.एमएच / १४ / एच.एम / ८१७१ ही त्यांनी चोरलेली असल्याचे सांगितलेने सदर रिक्षा मालक अशोक भाऊसाहेब पवार वय -३४ वर्षे धंदा फॅब्रिकेशन रा . कृष्णा हौसिंग सोसायटी मोरेवस्ती चिखली पुणे यांचा मोबाईल नंबर प्राप्त करून त्यावर त्यांना फोन करून त्यांचेकडे रिक्षाबाबत विचारपुस करता त्यांनी त्यांची रिक्षा चोरी गेली असल्याचे सांगितले . म्हणुन वरील तीन ही आरोपीविरुध्द चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा नोंद झालेला आहे .याने गुन्हयाची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरलेल्या रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या चोरीच्या रिक्षांची किंमत एकुण 2 लाख रुपये आहे.किंमतीची एक टिव्हीएस कंपनीची अॅटो रिक्षा तिचा आरटिओ नं . एमएच / १४ / एच.एम / ८१७१ बीएस -६ ही जप्त करण्यात आली आहे . सदर आरोपी पोलीस कस्टडीत असुन , त्यांचेकडे आणखी तपास चालू आहे . सदरची कामगिरी पोलीस आयुक्त साो , कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त परि -२ आनंद भोईटे , सहा . पोलीस आयुक्त सजंय नाईकपाटील देहुरोड विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने चिखली पो.ठाणे , पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर , व पोलीस अंमलदार सहा.पो.फौज.आनंद चव्हाण , पो.हवा.चेतन सावंत पो.हवा.सुनिल शिंदे , पोलीस हवालदार बाबा गर्जे , पोलीस नाईक नरहरी पो.शि.सचिन नाणेकर , पो.ना.विपुल होले , पो.ना.चंद्रशेखर चोरघे , पोलीस शिपाई संतोष सपकाळ , नलावडे , पो.शि.पिंजारी यांनी केली आहे .