श्रीगोंदा दि ११ :- ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला पुढील उपचार करण्यासाठी तसेच स्कॅन करण्यासाठी रुग्णवाहिका व खासगी वाहन मिळत नाहीए. अशा परिस्थितीत अनिल इरोळे व निखिल इरोळे हे वडील व मुलगा गावातील रुग्णांची विनामोबदला सेवा करत असून सध्याच्या परिस्थितीत खासगी रुग्णवाहिकाकडून प्रचंड लूट सुरू आहे. अशा परिस्थितीत श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव येथील खासगी वाहनधारकाने विनामोबदला २ वाहने रुग्णासाठी भैरवनाथ कोव्हिड सेंटरला दिली आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांवर त्वरित उपचार होण्यासाठी मदत होत असल्यामुळे समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. या कामाचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे. गरजूंसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार सर्व नागरिकांसाठी एक आदर्शवत उदाहरण ठरले आहे.
प्रत्येकानी असे पुढे आल्यास या महामारीवर विजय मिळविता येईल. यामध्यामातून लोकांचे प्राण वाचविता येईल. या महामारीत रोजगार गेले, रोज कमवून खाणारे कसे जीवन जगणार त्यांना आपल्या परीने मदत करूया, सर्वाना आधाराची गरज आहे. सर्वानी माझे कुटुंब, बरोबरच माझा गाव, माझा समाज, माझा देश असा विचार केल्यास कोरोनाला परतवून शकतो, असं अनिल इरोळे म्हणाले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेसाठी धावपळ बघायला मिळते. त्यामुळे या त्याच्याकडील दोन वाहनांना आता त्यांनी रुग्णवाहिका बनवलं आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे