पुणे दि ११ :- जेष्ठ नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेतील काँगेस पक्षाचे गटनेते आबा बागुल व पत्नी सौ जयश्री बागुल हे एकत्रित २००० नागरिकांच्या जेवणाचे डबे स्वतः स्वयंपाक करून देणार असून त्याचे निमित्त आहे. त्यांच्या लग्नाचा 42 वा वाढदिवस ! गेले १८ दिवस आबा बागुलांच्या पुढाकाराने कोरोना काळात परिसरातील गरीब व गरजु २००० व्यक्तींना विनामूल्य घरपोच जेवणाचे डबे पोहोच केले जात आहेत. यामध्ये गरीब, हातगाडीवाले, फेरीवाले,रिक्षावाले व हातावरचे पोट असलेल्या अश्या २००० नागरिकांना रोज डबा पोहोच केला जातो. त्यांच्या लग्नाचा ४२ व वाढदिवस १२ मे २०२१ रोजी असून हा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या कल्पनेतून या २००० व्यक्तींचे जेवण हे दाम्पत्य स्वतः स्वयंपाक करणार आहेत. व कार्यकर्त्यांच्या मदतीने डबे गरजू २००० लोकांच्या घरी दुपारी 12 ते 2 या वेळेत पोहोच करणार आहेत. हा उपक्रम पुढेही चालू राहणार आहे. जेवण तयार करण्याचा कार्यक्रम शिवदर्शन येथील राजीव गांधी इ लार्निग येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार असून या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जरी बागुल दाम्पत्य स्वतः स्वयंपाक करणार असतील तरी त्या दिवशी कोणीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शाळेत येऊन गर्दी करू नये. असे आवाहन आबा बागुल यांनी या प्रसंगी केले आहे. ज्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांनी दूरध्वनी वरूनच शुभेच्छा द्याव्यात असे त्यांनी कटाक्षाने सांगितले आहे.
आबा बागुल व बागूल कुटुंबीयांतर्फे दरवर्षी विनामूल्य काशी यात्रेचे आयोजन केले जाते. गेल्या 17 वर्षात 26 वेळा विनामूल्य काशी यात्रा आयोजित झाली त्यातील प्रत्येक वेळी वाराणसी (काशी) येथे सुमारे 2000 वयोवृद्ध माता पिता भाविकांसाठी आबा बागुल व त्यांची पत्नी सौ जयश्री बागूल स्वतःच्या हाताने 2000 व्यक्तींचा स्वयंपाक करून भाविकांना जेवण देत असतात. कोरोना काळात लग्नाचा 42 व्या वाढदिवशी स्वतः स्वयंपाक करून 2000 व्यक्तींना सुग्रास जेवणाचे डबे ते कार्यकर्त्यांच्या मदतीने पोहोच करणार आहेत. व अश्या रीतीने कोरोना काळात गर्दी न जमवता आगळ्या वेगळ्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत.