दौंड दि १० :- दे.राजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर १० मे रोज होत असलेलं १८ ते ४५ वयोगटातील लसीकरणाच्या सुरवात आजपासून होत आहे.तरी त्याकरिता शासनाने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.पण ,ह्या ऑनलाईन नोंदणी मुळे १०० ते १५० किलोमिटर वरील नागरिक प्रवास करून लसीकरण करण्यासाठी जे ठिकाण नोंद झाली तिथं प्रवास करून जात आहेत.मग,आता ह्या प्रवास मुळे कोरोना चां प्रसार होतो का नाही असा प्रश्न ग्रामीण नागरिकांना पडत आहे.
असाच प्रकार दे.राजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिसून येत आहे.आज १० मे चे १८ च्या पुढील लसीकरण ह्या ग्रामीण भागात होत असताना mh 14,mh 30 अश्या लांबच्या गाड्यांनी लोक दे.राजे येथे येऊन लस घेत आहेत.पिंपरी चिंचवड ,पुणे, येथील लोक १५० की.मी प्रवास करून लसी कारणासाठी आल्याचे आढलले.त्यामुळे स्थानिक १८ च्या पुढील नागरिकांना नोंदणी अभावी लस मिळत नाही.व बाहेरून नोंदणी धारक लस घेऊन जातात.यामुळं जिथं कोरोना प्रमाण कमी असताना वाढण्याची भीती येथील नागरिकांना लांबून येणाऱ्या नागरिकंन मुळ उत्पन्न होत आहे.स्थानिक नागरिक आदोगराच लस मिळत नाही म्हणून त्रस्त आणि अजून ग्रामीण भागात भीतीच वातावरण ह्या ऑनलाईन नोंदणी मुळ निर्माण होत आहे.तरी याची दखल स्थानिक प्रशासनाने व शासनाने लवकरात लवकर घ्यावी.अन्यथा स्थानिकांच्या रोषाला भविष्यात सामोरे जावे लागेल
दौंड प्रतिनिधी :- महेश पांडुरंग देशमाने.