पुणे दि ०३ :- बाणेर रोड परिसरातील सिंध हौसिंग सोसायटी या उच्चभु व खाजगी सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या सोसायटी मध्ये एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना केअर टेकर ब्युरोमार्फत काम करण्याच्या बहाण्याने येऊन त्यांच्या घराची रेकी करून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतु श्रृंगी पोलिसांनी अटक केले आहे. सहा जणांची टोळी असून, गेल्या आठवड्यात बाणेर रोड परिसरातील सिंध हौसिंग सोसायटी
येथील गुन्हा केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून 3 दुचाकी, सोने, हिऱ्याचे दागिने व कॅमेरा असा 17 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.संदीप भगवान हांडे (वय 25), मंगेश बंडू गुंडे (वय 20), राहुल कैलास बावणे (वय 22), विक्रम दीपक थापा उर्फ बीके (वय 19), किशोर कल्याण चनघटे (वय 21) आणि भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गेल्या आठवड्यात (दि. 25 एप्रिल) रात्री सिंध हौसिंग सोसायटीत घुसून उच्चभ्रू बंगल्यातील ज्येष्ठ दांपत्याला आणि त्यांच्या कुकला चाकूचा धाक दाखवून 15 लाख 80 हजार
रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी चतु श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत होते. यावेळी तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यावेळी या आरोपीची माहिती मिळाली. त्यांची माहिती काढत असताना ते औरंगाबाद, जालना, आणि नाशिक अशा विविध ठिकाणी असल्याचे समजले होते. व विविध ठिकाणी असल्याचे समजले . त्याप्रमाणे पोउनि मोहनदास जाधव व पोउनि महेश भोसले यांची दोन पथके तयार करुन या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे या
गुन्ह्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली. तर यापूर्वीचा देखील 1 गुन्हा त्यांच्याकडून उघडकीस आला आहे.
सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद, जालना आणि पुण्यात असे यापूर्वीचे सात गुन्हे दाखल आहेत. ते आधी केअरटेकर म्हणून संबंधित घरात जाऊन घराची रेकी करत आणि त्यानंतर दरोडे टाकत असल्याचे समोर आले आहे. संदीप हांडे हा जालना येथील एका दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. सदर कारवाई ही अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर , पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख , परिमंडळ ४ पुणे शहर व सहा.पोलीस आयुक्त रमेश गलांडे खडकी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) दादा गायकवाड , पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव , महेश भोसले व पोलीस अंमलदार पोहवा . दिनेश गडांकुश , मुकुंद तारू , पोना श्रीकांत वाघवले , प्रकाश आव्हाड , प्रमोद शिंदे , संतोष जाधव , ज्ञानेश्वर मुळे , सुधाकर माने , पोशि जारवाल यांच्या पथकाने केली आहे . सदर प्रकरणी पुढील ‘ अधिक तपास पोउनि मोहनदास जाधव व पोउनि महेश भोसले हे करीत आहत . तसेच नसिंग ब्युरो चालकांना त्यांचे कडील सर्व स्टाफचे व्हेरिफिकेश करुन घेणे बाबत , नवीन स्टाफ कामावर ठेवण्यापूर्वी त्यांचे व्हेरिफिकेशन करुन घेणे बाबत तसेच जेष्ठ नागरिक व पुणे शहरातील सर्व नागरिकांना ब्युरो मार्फत केअर टेकर म्हणुन स्टाफ ठेवण्यापुर्वी त्यांचे बाबत परिपुर्ण माहिती घेवूनच त्यांना घरी राहणेची परवानगी द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे .