पुणे दि ०२ :- राज्यातील सर्व कोविड पेशंटला मोफत ऑक्सिजन , बेड, वेन्टिलेटर मिळावे, तसेच पत्रकार , पोलिस, सफाई कर्मचारी, नर्स, डॉक्टर यांना विमाचे संरक्षण मिळावे व राज्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल राज्याने ताब्यात घ्यावे या मागणीसाठी पुण्यात कलेक्टर ऑफिस च्या परिसरात भाई विवेक चव्हाण यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता, दुपारी मुसळधार पाऊस आला व त्या पावसात हि अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी उपोषण चालूच आहे. पुणे शहर पोलिसांनी उपोषणाला मंडपाची परवानगी दिली असती तर पावसामुळे उपोषणाच्या ठिकाणची वाताहत झाली नसती तरी भरपूर साचलेल्या पाण्यात व भर पावसात ही जोपर्यंत कोविड पेशंटला मोफत ऑक्सिजन , बेड, वेन्टिलेटर मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही